Pooja Khedkar father News : पूजा खेडकरचे वडील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार!

Dilip Khedkar will contest assembly election : जाणून घ्या, विधानसभेसाठी त्यांनी कोणत्या पक्षाकडे मागितली आहे उमेदवारी?
Dilip Khedkar
Dilip KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Shevgaon-Pathardi Constituency News : लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखेंना आव्हान देणारे, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणारे दिलीप खेडकर आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, तशी भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. दिलीप खेडकर वादग्रस्त बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील आहे. पूजा खेडकर यांना खोटी कागदपत्रांसह विविध कारणांवरून केंद्रीय लोकसेवा आयोगानं नोकरीतून बडतर्फ केलं आहे.

निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लढवली होती. वंचित बहुजन आघाडीने लढवताना त्यांनी किटली चिन्हांवर निवडणूक लढवली. या निवडणूक सत्ताधारी पक्षाचे भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके मैदानात होते. यात सुजय विखेंचा पराभव झाला. या निवडणुकीत दिलीप खेडकर यांना 13 हजार 749 एवढी मते मिळाली.

Dilip Khedkar
Sharad Pawar: 'तुम्ही काही काळजी करू नका, 84 हो किंवा 90, हे म्हातारं काही..'; शरद पवारांचा महायुतीला इशारा

या निवडणुकीनंतर दिलीप खेडकर यांची मुलगी पूजा खेडकर(Pooja Khedkar) यांचं केंद्रीय लोकसेवा आयोगाचं खोटं कागदपत्रांचं प्रकरण बाहेर आले. पुणे इथं प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांची वागणूक चुकीची होती, अशी तक्रार तिथल्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. हे प्रकरणात वेगवेगळे खुलासे झाले, आणि पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसभा (UPSC) आयोगानं बडतर्फ केले. याच दरम्यान, पूजा खेडकर यांचे आई-वडील देखील अडचणीत आले होते. त्यांच्याविरोधात देखील गुन्हे दाखल झाले. पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.

दिलीप खेडकर यांनी यात जामीन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाल्याने मुलीला आणि कुटुंबियांना टार्गेट करण्यात आल्याचा आरोप दिलीप खेडकर यांनी केला. आता दिलीप खेडकर यांनी आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

Dilip Khedkar
Sharad Pawar on Ladki Bhain Yojna : 'पण एक गंमत आहे, गेल्या 10-20 वर्षांत बहीण आठवली नाही' ; पवारांचा महायुती सरकारला चिमटा!

दिलीप खेडकर यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून विधानसभेसाठी भाजपकडे तिकीट मागितलं आहे. या मतदार संघात भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनाच एकप्रकारे आव्हान दिलं आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्या अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा इरादा देखील दिलीप खेडकर यांनी व्यक्त केला आहे. दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषद घेताना भाजपचे माजी पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर देखील उपस्थित होते. मराठा-ओबीसी संघर्षात ओबीसींची बाजू घेत, मराठा समाजाला विरोध नाही, अशीही भूमिका दिलीप खेडकर यांनी मांडली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com