Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात धक्कादायक वळण; वडील दिलीप खेडकर यांचे थेट 'या' मंत्र्यावर गंभीर आरोप

Dilip Khedkar Allegations: आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्यामुळे दबाव होता.त्यामुळे मला इतके दिवस समोर येता आले नाही. पण माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी काही माहिती देण्यात आली आहे, ती वस्तुस्थितीला धरून नाही.
Pooja Khedkar- Dilip Khedkar
Pooja Khedkar- Dilip KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : वादग्रस्त आणि बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकारने तिच्यावर मोठी कारवाई करत पूजाला बडतर्फ केले. दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत पूजाने IAS केडर मिळवले होते. तसेच नावात बदल करून तिने अनेकदा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप देखील तिच्यावर आहे.

पूजा खेडकर (Pooja Khedkar) खोटं बोलत असल्याचा आरोपही यूपीएससीने केला आहे. अशातच आता पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी थेट महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी शुक्रवारी (ता.4) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याची भूमिका स्पष्ट केली. खेडकर म्हणाले, माझ्या मुलीला जो त्रास झाला, तो माझ्यामुळेच झाला असल्याचं आपलं ठाम मत आहे. मी नगर दक्षिणमधून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मुलाविरोधात निवडणूक लढवली होती.त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

विखे पाटील यांच्या मनामध्ये मी निवडणूक लढवल्याचा राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहिजे होता.तो मिळाला नाही.प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये.या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिल्याचंही खेडकर यांनी म्हटलं आहे.

Pooja Khedkar- Dilip Khedkar
Anil Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्याला आमदार करण्याची मंगळवेढा राष्ट्रवादीला भलतीच घाई!

दिलीप खेडकर म्हणाले, आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्यामुळे दबाव होता.त्यामुळे मला इतके दिवस समोर येता आले नाही. पण माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी काही माहिती देण्यात आली आहे, ती वस्तुस्थितीला धरून नाही.तिच्या बाबतीत एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती दिली गेली ती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे, असा आरोपही दिलीप खेडकर यांनी केला आहे.

यूपीएससीने (UPSC) पूजा खेडकरची 31 जुलै रोजी उमेदवारी रद्द केली होती. तसेच त्यांना यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये बसता येणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं. याशिवाय तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

Pooja Khedkar- Dilip Khedkar
Bharane Vs Patil : दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना डिवचले; 'मला पूर्वीही अन्‌ आताही चांगली झोप लागते'

केंद्र सरकारकडून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सरकारी सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होईल, असेही सरकारनं स्पष्ट केलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com