बाहेर लससाठी रांगा, रुग्णालयात कोव्हॅक्सिनओतली बेसिनमध्ये!

महापालिकेतील संतापजनक प्रकारबाबत शासनाकडून स्वतंत्र चौकशीची गरज
Dhule Municiple corporatin building
Dhule Municiple corporatin buildingSarkarnama
Published on
Updated on

धुळे : कोरोना (Covid19) लस घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागत होत्या. मात्र, या विपरीत धुळे (Dhule) महापालिकेत संतापजनक प्रकार घडत होता. डोस न देता आर्थिक फायद्यासाठी बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरित केले जात होते. हे पाप झाकण्यासाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस अक्षरशः बेसिनमध्ये ओतली जात होती. शहर पोलिसांच्या (Police) चौकशीत काही संशयितांनी ही कबुली दिली आहे.

Dhule Municiple corporatin building
Collector : सरकारी नोकरीत सामावून घ्या, म्हणत त्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली धमकी..

महापालिकेने बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा दडपण्याच्या नादात शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे, तर आर्थिक फायद्यासाठी यूझर आयडी व पासवर्डची चोरी करून तीन हजार १९१ व्यक्तींना बनावट लसीकरण प्रमाणपत्र दिले, अशी फिर्याद प्रशासनाने दिली आहे. हा सर्व गंभीर प्रकार १४ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Dhule Municiple corporatin building
धक्कादायक...आदित्य ठाकरेंच्या कारवाईनंतर हरकतींचा पाऊस

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

एक क्षण ही स्थिती खरी असल्याचे मानले तर कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन लशीचा वापर न करता बनावट प्रमाणपत्र जनरेट करून वितरित झाले. मग जितके प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील लशीच्या बाटल्यांचे काय झाले हा प्रश्‍न अनुत्तरितच होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने प्रथम चार संशयितांना अटक केली. त्या वेळी काही संशयितांनी कबुलीत कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस बेसिनमध्ये ओतली आणि पुरावा नष्ट केल्याची धक्कादायक माहिती दिली. हा अत्यंत गंभीर व निषेधार्ह, संतापजनक प्रकार घडला आहे. एकीकडे आबालवृद्ध लस घेण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकाधिक साठा मिळवून नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी धडपडत होते, तेव्हा येथील महापालिकेत बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा घडत असताना, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस अक्षरशः बेसिनमध्ये ओतून वाया घालविली जात होती.

चौकशीतून मुसक्या आवळा

या प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि लशीच्या बाटल्यांचा हिशेब घेत दोषींच्या मुसक्या आवळाव्यात. शहर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनीही हा जनहिताचा महत्त्वाचा मुद्दा फेरचौकशीत घ्यावा आणि जिल्हा न्यायालयास अवगत करून देत दोषींच्या मुसक्या आवळाव्यात. हे निषेधार्ह प्रकरण तडीस नेण्यासाठी संबंधित नर्स, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यापैकी कुणाचीही गय न करता त्यांना तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जनमानसातून होताना दिसते. महापालिकेत लशीच्या नेमक्या किती बाटल्या बेसिनमध्ये ओतल्या, त्यात कोण-कोण सहभागी होते, लस बेनिसमध्ये ओतताना त्यांच्या संवेदना कुठे हरपल्या होत्या, आर्थिक घोटाळ्याचे पाप लपविण्यासाठी जनतेच्या रक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी लस बेसिनमध्ये ओतण्याचे धाडस का झाले, या सर्व बाबींची राज्य शासनासह पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस वाया घालविण्यात आली व बेसिनमध्ये ओतण्यात आली. याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या लसीकरण कार्यक्रमाला येथे गैरप्रकारातून खो घालण्यात आला. त्या वेळी अटकेतील संशयितांनी पोलिस चौकशीत ही माहिती दिल्यावर ती कामकाजावेळी कायदेशीर लढाईत अवगत करून देण्यात आली का यांसह विविध प्रश्‍न धुळेकरांच्या मनात घर करून आहेत.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com