Good News...कोरोना नियंत्रणात...दुकाने, हॅाटेल्स रात्री १२ पर्यंत सुरु!

कोरोनाचा प्रसार रोखण्यात राज्य शासनाला महत्त्वपूर्ण यश आले आहे.
Sitaram Kunte, Chief secretary
Sitaram Kunte, Chief secretarySarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यात राज्य शासनाला महत्त्वपूर्ण यश आले आहे. (State Government success to control covid19 epidemic) त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आले असून दुकाने व हॅाटेल्स आता रात्री बारा पर्यंत सुरु राहणार आहेत. (Shop & Hotels remain open till midnight) त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठांत या निर्णयाचे स्वागत (This decision welcome on the eve of Diwali) होत आहे.

Sitaram Kunte, Chief secretary
निर्धास्त व्हा, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही?

साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपातकालीन व्यावस्थापन कायदा २००७ अन्वये राज्यात कोरोना साथ नियंत्रणाबाबत नियंत्रणाचे आदेश काढण्यात आले होते. त्यात शिथिलता देण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज याबाबतचा आदेश काढला आहे.

Sitaram Kunte, Chief secretary
जळगावमध्ये राष्ट्रवादीला भाजप नको; धुळे-नंदूरबारला मात्र गळाभेट!

मुख्य सचिवांच्या या आदेशामुळे राज्यात सर्वच क्षेत्रात विशेषतः व्यापारी वर्गाने त्याचे स्वागत केले आहे. यामुळे कोरोनाची साथ येण्यापूर्वीची स्थिती निर्माण होण्यास चालना मिळेल.

राज्य शासनाने विविध औद्योगिक, व्यापारी संस्था, दुकाने, हॅाटेल्स याबाबत यापूर्वी जारी केलेले निर्बंध उठविले आहे. नव्या आदेशानुसार दुकाने हॅाटेल्स मध्यरात्री बारापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आहे. अन्य संस्था रात्री अकरापर्यंत सुरु राहतील. यामध्ये स्थानिक प्रशासन स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करू शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com