Nashik Crime News: राजकीय नेत्यांचा गुन्हेगारीत सहभाग पोलिसांसाठी चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दल आता रस्त्यावर उतरले आहे. टवाळखोरांचे आश्रयस्थान असलेले अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.
नाशिक शहरात आरपीआय पाठोपाठ भाजपचा नेता गोळीबारात सापडला. गोळीबाराच्या या घटना आणि वाढते खून हे पोलिसांना आव्हान आहे. पोलिसांनीही आता हे आव्हान मोडीत काढण्यासाठी कारवाई सुरू केली आहे
शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी रस्त्यावर उतरत टवाळखुरांचे अड्डे उध्वस्त केले. महापालिकेच्या बुलडोझरसह शहरातील मखमलाबाद नाका भागात ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी त्यात स्वतः पुढाकार घेतला.
गेल्या आठवड्या भर टवाळखुरांचे विविध अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. चारशेहून अधिक गुन्हेगारांची ओळख परेड केली. दहशत पसरविणाऱ्यांची त्याच भागात वरात काढण्यात आली. त्यांची ही कारवाई समाज माध्यमांतून चर्चेत होती.
विशेष म्हणजे आता पोलिस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री आदित्य योगी यांनी उत्तर प्रदेशात गुन्हेगारांची घरे बुलडोझरने पाडली. नाशिक शहरातही टवाळखोर आणि गुन्हेगारांचे अड्डे असलेले बेकायदेशीर शेड आणि टपऱ्या उध्वस्त करण्यात आल्या. त्याचा चांगलाच धसका गुन्हेगारांनी घेतला आहे.
शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात संताप आहे. येईल त्याला पक्षप्रवेश दिल्याने सामान्य नागरिकांमध्ये त्याचा वाईट संदेश गेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधकांनी या विषयावर भाजपला टार्गेट केले आहे.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना अचानक वाढलेली गुन्हेगारी महायुतीला अडचणीची ठरू शकते. यासंदर्भात भाजपच्या स्थानिक आमदारांनी ही आपल्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांवरही दबाव वाढल्याचे चित्र आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.