Nashik crime: भाजपचा पाय खोलात, दोन माजी नगरसेवकांपाठोपाठ भाजपच्या तिसऱ्या नेत्यावर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल

Nashik gripped by political crime, case registered against BJP's Ajay Bagul, BJP's problems increase -नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भाजपपुढे प्रतिमा सावरण्याचे आव्हान.
Ajay Bagul
Ajay BagulSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादग्रस्त नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. वरिष्ठ नेत्यांनी त्याचे समर्थन केले. हेच समर्थन आता भाजपच्या अडचणी वाढविणारे ठरले आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि खुनाच्या घटना वाढत आहे. सत्ताधारी महायुतीशी संबंधित विविध नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या दहशतीच्या आणि टोळीच्या हल्ल्यांमुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सहभागामुळे गंभीर स्थिती ओढवली आहे. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना हत्ते प्रकरणात अटक झाली आहे. आता हत्येच्या इराद्याने गोळीबार प्रकरणी अजय बागुल हा भाजपचा तिसरा नेता अडचणीत आला आहे.

Ajay Bagul
Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर केली महायुतीची राजकीय कोंडी?

तीन दिवसांपूर्वी शहरात जुन्या वादातून सचिन साळुंखे याच्यावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला होता. साळुंखे यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या साथीदारांचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती.

Ajay Bagul
Extortion Case : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याचा निकटवर्तीय प्रकाश लोंढेला अटक; खंडणीच्या गुन्ह्यात मुलगा फरार!

या प्रकरणात आता भाजपचे नेते अजय बागुल यांसह दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रेम कुमार काळे गौरव बागुल सुदाम शेळके वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे यांना अटक करण्यात आली आहे. अजय बागुल सह अन्य आरोपी फरार झाले असल्याचे, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले.

यापूर्वी माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि बाळासाहेब पाटील या दोन नगरसेवकांना खुणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अजय बागुल हे तिसरे भाजपचे नेते आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादग्रस्त आणि गुन्हेगारीशी संबंधित नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत हंड्रेड प्लस अशी घोषणा केली आहे. यासाठी कोणाचेही पक्षात स्वागत असेल अशी घोषणा या नेत्यांनी यापूर्वी केली होती. सहज म्हणून केलेली घोषणा अथवा राजकीय धोरण म्हणून केलेले विधान आता भाजपची राजकीय अडचण करीत आहे.

शहरातील नागरिक विविध प्रश्नांनी त्रस्त आहेत. यामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नांवर नागरिक संतप्त आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे एकापाठोपाठ एक नेते गुन्हेगारीत अडकत असल्याने पक्षाची अडचण वाढत आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com