Long March News; विधानभवनात फलक झळकवून जोरदार आंदोलन!

लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह आमदार विनोद निकोले यांनी धरला.
MLA Vinod Nikole at Vidhanbhavan
MLA Vinod Nikole at VidhanbhavanSarkarnama

मुंबई : किसान सभेतर्फे (Kisan Sabha) आदिवासी, (Trible) शेतकऱ्यांनी (Farmers) विविध मागण्यासाठी नाशिक (Nashik) ते मुंबई (Mumbai) लाँग मार्च सुरु केला आहे. या लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशा जोरदार घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) आमदार विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी विधानभवनात फलक झळकवले. (On third day trible & Farmers Long March cross Igatpuri towards Mumbai)

अखिल भारतीय किसान सभेतर्फे तीन दिवसांपूर्वी दिंडोरी (नाशिक) येथून विविध मागण्यांसाठी आदिवासी व शेतकऱ्यांनी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च सुरु केला आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कपचे आमदार निकोले यांनी आज विधानभवनात फलक झळकावत शासनाचे लक्ष वेधले.

MLA Vinod Nikole at Vidhanbhavan
Amruta Pawar News: `राष्ट्रवादी`ला धक्का...मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश?

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या लाँगमार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. 20 मार्चला तो मुंबईत धडकणार आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला कांदा पिकाला सहाशे रुपये प्रती क्विंटल अनुदान द्यावे. दोन हजडार रुपये दराने नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा.

शेतीसाठी बारा तास वीज उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ केली गेली पाहिजे. अंगणवाडी सेविका, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार कामगार, ग्रामसेवक, पोलीस पाटील या जनतेशी निघडीत असलेले कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेऊन वेतन श्रेणी लागू करण्यात यावी.

MLA Vinod Nikole at Vidhanbhavan
BJP News; `राष्ट्रवादी`च्या अमृता पवार, शिवसेनेच्या तनुजा घोलप यांचा भाजप प्रवेश

शासनाच्या घरकुल योजनांमध्ये गरीब कुटुंब राहतात. तसेच शेतकरी, कामगार, झोपडपट्टी राहणारे गरीब कुटुंब आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत त्यांना 1.40 लाख रुपये देण्यात येतात. मात्र वाढत्या महागाईमध्ये ही रक्कम अपुरी पडते. लाँगमार्चच्या माध्यमातून ही रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी.

लाँग मार्चच्या विविध मागण्या आहेत. या रास्त मागण्या घेऊन शेतकरी नाशिकहून निघालेला आहे. 2016 - 17 मध्ये देखील नाशिकहून असाच पायपीट करून हा शेतकरी मुबईमध्ये धडकला होता. त्यात महिलांचे, शेतकऱ्यांचे पाय अक्षरशः रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळेस देखील राज्य सरकार हे भाजपाचे होते. त्यांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिले होते.

MLA Vinod Nikole at Vidhanbhavan
Gopichand Padalkar News; मेंढपाळांसाठी ठोस तरतुद असलेला पहिला अर्थसंकल्प

त्यावेळी वन पट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात येईल, जी जमीन कब्जामध्ये आहे ते क्षेत्र जीपीएस द्वारे मोजणी करून संबंधीतांच्या नावे करण्यात येईल अशा विविध मागण्या होत्या. त्या सोडविण्याचे आश्वासन लिखीत दिले होते. परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व बाबींचा विचार करून हा लाँगमार्च निघाला आहे.

आज विधानसभेत दुपारी बाराला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शून्य प्रहर अन्वये लाँगमार्च संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावर माकप आमदार विनोद निकोले यांनी देखील निवेदन केले. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, जेवढ्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक विचार करून निणर्य घेण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com