Crime News: थरार..! कुत्रा विकत घेण्यासाठी आला अन् अडकला; डॉक्टरच्या घरी 35 लाखांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

Ahmednagar Police: एका डॉक्टराच्या घरी 35 लाखांच्या ऐवजाची चोरी, दोन पोलिस अधिकारी अन् 12 कर्मचाऱ्यांचा तब्बल दीड महिने तपास
Ahmednagar Police
Ahmednagar PoliceSarkarnama

Ahmednagar News: नगर शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील एका डॉक्टरांच्या घरी हिरे, मोती आणि 55 तोळे दागिने, असा एकूण 35 लाखांच्या ऐवजाची चोरी... दोन पोलिस अधिकारी आणि 12 कर्मचाऱ्यांचा दीड महिने तपास...70 ठिकाणांच्या 150 'सीसीटीव्हीं'च्या चित्रीकरणाची तपासणी...संशय 12 जणांकडे चौकशी...अन् गुन्ह्याची उकल होताच, पोलिस अधीक्षकांकडून कोतवाली पोलिसांना 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर...

नगर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी 23 ते 28 ऑक्टोबरदरम्यान मोठी चोरी झाली. चोरी सफाईदारपणे केली होती. कोतवाली पोलिसांनी दीड महिने तपास केल्यानंतर या गुन्ह्यात राहुरीतील दीपक सर्जेराव पवार (वय 32,रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) याला अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश आोला आणि कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ahmednagar Police
DCM Ajit Pawar: दादांनी वेळ दिल्याने सहा हजार नागरिकांचं स्वप्न पूर्ण होणार; 'म्हाडा'च्या लाॅटरीला अखेर मुहूर्त

डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरातील कपाटाच्या लॉकरमधून हिरे, मोती, महागडे खडे, सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. डॉ. ऋषभ फिरोदिया यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या चोरीवरून राजकीय नेत्यांनी पोलिस दलाला टार्गेट केले होते.

कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांसह चोरीच्या घटनास्थळी तपासणी केल्यानंतर सफाईदारपणे झालेल्या चोरीची उकल करण्याचे आव्हान होते. तपास सुरू झाला, पण सुरुवातीला धागेदोरे हाती लागत नाहीत, परंतु तपासात सातत्य ठेवण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक यादव यांनी तपास पथकाला केली. तपासावर असलेल्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासात सीसीटीव्हीतील चित्रीकरणाची तपासणी केली.

Ahmednagar Police
MNS News : मनसे जिल्हाध्यक्षासह 45 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. पोलिस अधीक्षक ओला यांचे मार्गदर्शन घेत पोलिस निरीक्षक यादव यांनी पथकाला तपासाच्या पुढच्या सूचना केल्या. यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवार भोवती सापळा आवळला. दीपक पवार याला राहुरी बस स्थानक परिसरातून कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाने ताब्यात घेतले. दीपक पवार सुरुवातीला काहीच सांगत नव्हता.

दिशाभूल करत होता. विसंगत माहिती द्यायचा, पण विसंगत माहितीमुळे तोच त्याच्या जाळ्यात फसला आणि गुन्ह्याची माहिती सांगून बसला. दीपक पवार याने चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेले सोने परभणी येथील सराफाला विकल्याचे त्याने कोतवाली पोलिसांना सांगितले. कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपक याच्या घरातून सुमारे 35 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. दीपक पवार याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

70 ठिकाणी दीडशे सीसीटीव्हीची तपासणी

दीपक पवार याने सराईतपणे चोरी केली होती. या चोरीची उकल करण्याचे आव्हान होते. तांत्रिक तपासात सुरुवातीला धागेदोरे मिळत नव्हते, परंतु बारकाईने तपास केल्यावर त्यात दीपक पवार भोवती संशय बळावला. यासाठी दोन अधिकारी आणि 14 पोलिस कर्मचाऱ्यांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील 70 ठिकाणचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासले. यानंतर दीपक पवारपर्यंत पोलिस (Crime News) पोहोचले. दीपक पवार हा कुत्रा विकत घेण्यासाठी फिरत होता. त्याचवेळी कोतवाली पोलिसांनी त्याला राहुरी बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

अडीच तासांनंतर लॉकर उघडले...

दीपक पवार याने डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरात दोन वेळा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला घड्याळ आणि रोख रक्कम चोरली होती. त्यानंतर दुसऱ्यावेळी दागिन्यांची चोरी केली. कपाटाचे लॉकर दीपकला उघडत नव्हते. जोरात आवाज होईल म्हणून दीपक हा कपाट सावकाश उघडत होता.

यासाठी त्याने अडीच तास घेतले. लॉकर उघडल्यानंतर त्यातील दागिने घेऊन दीपकने पुन्हा कुलूप लावून तसेच ठेवले. दीपकच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांनी त्याच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या 12 जणांची चौकशी केली. शेवटी दीपक पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

(Edited by- Ganesh Thombare)

Ahmednagar Police
Shivsena UBT News : बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हटवलेल्या जगतापांना सहानुभूती ; 'हा माझा अंत नाही...’ ही पोस्टही चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com