Transfers Of Police Officer : साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची बदली; 'यांच्या'कडे असेल नवी जबाबदारी

Satara Police : सहसचिव व्यंकटेश भट यांनी या मंगळवारी या बदलीचे आदेश दिले.
Transfers Of Police Officer :
Transfers Of Police Officer : Sarkarnama
Published on
Updated on

Satara Politics : सातारा पोलिस दलामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून आंचल दलाल (डूडी) यांची नियुक्ती झाली असून, यापूर्वी त्यांनी सातार्‍यातच सहायक पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. सहसचिव व्यंकटेश भट यांनी या मंगळवारी बदलीचे आदेश दिले.

Transfers Of Police Officer :
Kesharbai Kshirsagar News : केशरबाई क्षीरसागरांचा मुत्सद्दीपणा अन् करारी बाणा; दिग्गजांशी दोन हात करत निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व...

नव्या अतिरिक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांची सुमारे एक वर्षापूर्वीच सातार्‍यातून सांगली येथे बदली झाली होती. सातार्‍यात असताना ‘निर्भया पथक’ यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. याशिवाय एटीएममधून चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले होते. (Satara Police) कडक शिस्तीच्या महिला अधिकारी म्हणून त्यांची सातार्‍यात ओळख राहिली आहे. एका वर्षातच पुन्हा त्यांची साताऱ्यात बदली करण्यात आली आहे.

बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवड येथे, तर साताऱ्यात त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. दलाल यांची दुसर्‍यांदा सातार्‍यात बदली झाली आहे.

दुसरीकडे पिंपरी- चिंचवड शहरासाठी नुकतेच अपर पोलिस आयुक्तांचे एक आणि उपायुक्तांच्या दोन पदांसाठी मंजुरी मिळाली आहे. आज दोन्हीही पोलिस उपायुक्त आयुक्तालयात हजर झाले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अपर पोलिस आयुक्तांऐवजी पोलिस उपायुक्त पदावरील एक अधिकारी देण्याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर राज्य सरकारने पोलिस उपायुक्त बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली केली आहे.

Transfers Of Police Officer :
Pankaja Munde News : 19 कोटींचा 'GST' भरणार; पण बँकांचे कर्ज कसे फेडणार? पंकजाताई कसा मार्ग काढणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com