Dada Bhuse Politics: दादा भुसे धावले पक्षाच्या मदतीला, म्हणाले, "शिवसेनेत गटबाजी नाही"

Dada Bhuse Denies Factionalism in Shiv Sena Supports Party Unity: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पक्षातील वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गटबाजी नाही, असा दावा केला आहे.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहे. या संदर्भात विविध बैठका झाल्या. मात्र वरिष्ठ नेत्यांपुढे पक्षातील गटबाजीचे प्रदर्शन घडले होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची बैठक झाली. पक्षाचे सचिव राम रेपाळे यांच्या स्वागतासाठी ही बैठक होती. मात्र बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने तो वादाचा विषय ठरला होता.

दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या तयारीची चर्चा होती. मात्र शहर प्रमुख बंटी तिदमे यांचं विविध माजी नगरसेवक गटबाजीची तक्रार घेऊन ठाण्याला पोहोचले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली.

Dada Bhuse
Chhagan Bhujbal Politics : छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात जोरदार कमबॅक; ओबीसी नेतृत्व पुन्हा सत्तास्थानी

यासंदर्भात गेले काही दिवस शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील पदाधिकाऱ्यांची तोंडे विविध दिशांना आहेत. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी पक्षाला अपेक्षित तयारी शहरात दिसून येत नाही. त्याबाबत दोन्ही गट एकमेकांवर दोषारोपण करताना दिसले.

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. पक्षातील गटबाजीला सावरण्यासाठी ते पुढे आले आहेत. पक्षातील गटबाजी फारशी गंभीर नाही असा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

याबाबत मंत्री भुसे यांच्या मते प्रत्येक कुटुंबात भिन्न मतप्रवाह असतात. वादही असतात. मात्र ते फार गांभीर्याने घेण्याचे आवश्यकता नसते. वेळ आल्यावर सबंध कुटुंब वाद विसरून एकत्र येत असते. त्यामुळे पक्षाच्या कुटुंबात भिन्न मतप्रवाह आहेत मात्र पक्षात कोणतीही गटबाजी नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

आता आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाची तयारी केली आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. मात्र जिथे महायुती नसेल अथवा उमेदवारांबाबत एकमत होत नसेल तिथे शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर निवडणुकीची तयारी करेल, असे सूचक वक्तव्य देखील मंत्री भुसे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com