NCP Politics : अजितदादांच्या नवसंकल्प शिबिराच्या मंडप उभारणीत उमटली 'गुलाबी छटा'

DCM Ajit Pawar Nationalist Congress Party pink color Navsankalp camp Shirdi : शिर्डी इथं उद्या शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराची तयारी सुरू आहे.
DCM Ajit Pawar 1
DCM Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर राजकारणात महायुतीच्या मदतीने वाटचाल सुरू केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय होणार, असा प्रश्न होता.

परंतु विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 'गुलाबी' रंगाचे जॅकेट अंगावर चढवलं अन् महाराष्ट्र पिंजून काढला. विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 41 आमदार निवडून आणले. या यशामागे अजित पवार यांनी विधानसभेला निवडलेला 'गुलाबी' रंग असल्याचे बोलले जाते. आता विधानसभेतील यशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत नवसंकल्प शिबिर होत आहे. या शिबिरात देखील 'गुलाबी' रंगाची छटा उमटणार, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीला समोरं जाताना शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवारांनी साथ सोडली. यानंतर विधानसभा निवडणुकीत गुलाबी जॅकेट, गुलाबी कारसह राज्यभरात अनेक ठिकाणी प्रचार केला. गुलाबी जॅकेटमुळे ते सतत चर्चेत होते. यावेळी त्यांना मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला होता.

DCM Ajit Pawar 1
Sangram Jagtap : शिर्डीतील 'नवसंकल्पा'पूर्वीच अजितदादांच्या लाडक्या शिलेदाराचा हिंदुत्वाचा हुंकार

अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार (Ajit Pawar) यांनी याच योजनेवर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी प्रभावीपणे गुलाबी रंगाचा वापर केला. राज्याच्या राजकारणात ते सतत पांढऱ्या रंगाच्या कपड्यात वावरत होते. परंतु यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेटाबरोबर संपूर्ण दौऱ्यात गुलाबी रंगाला प्राधान्य दिलं होतं.

DCM Ajit Pawar 1
Dhananjay Munde News : धनंजय मुंडे गोत्यात? हायकोर्टाने जुन्या प्रकरणात सरकारला दिले आदेश

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले. यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्रात गुलाबी रंग का निवडला, यावर प्रतिक्रिया दिला होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले गेले. या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा झाला. गुलाबी रंगाचा विजय झाला, महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.

आता विधानसभा निवडणुकीनंतर शिर्डीत अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे नवसंकल्प शिबिर होत आहे. या शिबिराची तयारी जोरात सुरू आहे. शिबिरासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात गुलाबी रंगाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या नवसंकल्प शिबिरात अजित पवार पक्षाच्या राज्यातील, देशातील वाटचालीसाठी आणि आगामी काळात राज्यातील राजकीय निश्चितीसाठी कोणती गुलाबी घोषणा करतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com