Shirpur Toll Tax: रस्ता ९०० कोटींचा, वसुली २००० कोटींची, तरीही सवलतीला नकार!

Shirpur agitation; Shirpur people said will not pay toll tax from tomorrow-शिरपूर येथे टोल टॅक्स विरोधात शहरवासीयांनी पुकारला एल्गार, राजकारण तापले
Citizen agitation at Shirpur Toll PlaZa
Citizen agitation at Shirpur Toll PlaZaSarkarnama
Published on
Updated on

Shirpur Toll Tax News: शिरपूर (धुळे) येथे मुंबई अग्रा महामार्गावर होणारी टोल वसुली वादाचा विषय ठरली आहे. या संदर्भात गेले दोन महिने सातत्याने आंदोलन सुरू आहे. आता आंदोलकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

शिरपूर (धुळे) शहरवासीयांना मुंबई आग्रा महामार्ग वरील प्रवासासाठी टोल द्यावा लागतो. हा टोल अतिशय जाचक आणि न परवडणारा आहे. याबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी असूनही त्यावर मार्ग काढण्यात आला नव्हता.

Citizen agitation at Shirpur Toll PlaZa
Ajit Pawar Politics: शरद पवारांना धक्का, माजी नगरसेवक नाना महाले अजित पवारांच्या पक्षात!

शहरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘शिरपूर फर्स्ट’ या संघटनेने याविरुद्ध आवाज उठविला आहे. या संदर्भात बैलगाडी आणि सायकल रिक्षा घेऊन टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक त्यात सहभागी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Citizen agitation at Shirpur Toll PlaZa
Shirdi Voter Fraud : शिर्डीत बोगस मतदार नोंदणी, सभापती शिंदेंची गंभीर टिप्पणी; मंत्री विखेंना दिला घरचा आहेर

यावेळी नागरिक आणि टोल प्रशासनात जोरदार वादावादी झाली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान उद्यापासून टोल टॅक्स भरायचा नाही, असा ठराव एकमताने करण्यात आला. त्यानंतरच हे आंदोलन परत गेले.

स्थानिक नागरिकांना टोल मध्ये माफी द्यावी ही मागणी आहे. टोल प्रशासनाने याबाबत सवलतीचा पास देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र त्याबाबत एकमत न झाल्याने शिरपूर वाशियांसाठी हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.

शिरपूर येथे उड्डाणपूल आणि महामार्ग रुंदीकरणाच्या कामावर ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्या बदल्यात आतापर्यंत दोन हजार कोटींची टोल वसुली झाली आहे. टोलचे दर अवाजवी असल्याची देखील तक्रार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली होऊनही नागरिकांना सवलत देण्यास नकार दिल्याने टोल कंपनी विरोधात वातावरण तापले आहे. या आंदोलनामुळे आता कोणत्याही परिस्थितीत शिरपूर वासियांनी टोल देऊ नये, असे ठरले आहे. या संदर्भात टोल वसुली करणारे प्रशासनाने मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय होऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे.

एकंदरच टोलचा प्रश्न शिरपूर शहरात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यात स्थानिक आमदार आणि खासदारांची ही कोंडी होऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी असून केंद्रात आणि राज्यात देखील भाजपचीच सत्ता आहे. असे असतानाही टोल माफी होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. आता पुढे काय होते याची उत्सुकता देखील वाढली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com