Maha Vikas Aghadi V/S BJP : उद्धव ठाकरेंचा फोटो अन् आक्षेपार्ह मजकूर व्हायरल, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवा...

Sangamner News : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून समाज माध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. या प्रकारावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Sangamner Police
Sangamner Policesarkarnama
Published on
Updated on

Nagar News : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो एडिट करून आणि त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहित समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. या प्रकारावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलिसांकडे (Sangamner Police) याबाबत धाव घेत तक्रार केली. हा प्रकार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलिसांकडे तक्रार करत दिपक भगत आणि अजित मणियार या दोघांविरोधात कारवाई मागणी करण्यात आली. समाज माध्यमावर यापूर्वी देखील भाजपसोबत असणारा दिपक भगत याने उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हायरल केला होता. आता देखील "सौ शहरी एक संगमनेरी" या व्हॉट्सॲप  ग्रुपवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटा आणि त्यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangamner Police
Balasaheb Thorat News : प्रवरा नदीतील घटनेवरून विखे पाटलांना सुनावले; बाळासाहेब थोरात नेमके काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचा फोटो व्हायरल करून त्यामागे जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा संशय येतो, असे म्हणणे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर पोलिसांसमोर मांडले. ही मनोविकृती आहे. पोलिसांनी अशाचा तातडीने बंदोबस्त करावा. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पोलिसांनी अलर्ट राहावे. संगमनेरमधील वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. Offensive text about Uddhav Thackeray by BJP workers on social media goes viral in Sangamner

संगमनेर शहर (Sangamner City) व्यापारी शहर आहे. असे असताना प्रत्येक ठिकाणी राजकारण आणून आपली पोळी भाजणे, हा चुकीचा प्रकार आहे. अशा प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महाविकास आघाडी नेहमीच संगमनेर पोलिसांबरोबर आहे. यामुळे संगमनेरमध्ये जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीने संगमनेर पोलिसांकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. संगमनेर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Sangamner Police
Vishal Patil News : काँग्रेसच्या जेवणाला विशाल पाटलांची एन्ट्री, ठाकरे गट खवळला; "गल्ली ते दिल्ली..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com