Rohit Pawar: शासकीय यंत्रणाचा गैरवापरातून लोकशाहीची पायमल्ली!

पिंपळगाव बसवंत येथे आमदार रोहित पवार यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

पिंपळगाव बसवंत : दोन महिन्यात राज्यात (Maharashtra) झालेल्या राजकीय घडामोडींनी (Political Activities) महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली. शासकीय यंत्रणाचा (Missuse of Government machinery) गैरवापर करून लोकशाहीची (Democracy) पायमल्ली सुरू आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवानेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली. (MLA Rohit pawar visits Pimpalgaon Baswant APMC)

MLA Rohit Pawar
NMC : ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ने करा सुरूवात; अतिरिक्त आयुक्त राम जोशींचे आवाहन...

ते म्हणाले, `नाफेड`ने खरेदी केलेल्या ठिकाणीच कांदा विकत असेल तर शेतकऱ्यासाठी ही संस्था कुचकामी आहे. पिकते तेथे खरेदी करून विकते तेथे शेतीमाल पाठवायला हवा असे स्पष्ट करताना बाजार समिती निवडणुकीच्या मतदानाबाबत सततचे बदलणारे नियम योग्य नाहीत.

MLA Rohit Pawar
Beed : टॅंकर घोटाळा प्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

पिंपळगाव बाजार समितीत शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, चार महिने साठवणूक केलेल्या कांद्याला भाव वाढले, पण यात केंद्र किंवा राज्य सरकाराचे श्रेय नाही. उत्पादनात ४० टक्के घट होऊन मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला. त्यामुळे बाजारभावात सुधारणा झाली आहे. शेतीचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही शिल्लक राहत नाही,

यावेळी आमदार पवार म्हणाले, कृषी निविष्ठा कंपन्यांचे शेअर दोनशे पटीने वाढले. पण शेतीमालाचे दर थोडेही वधारले तरी मोठी चर्चा होते. आज मिळणारा दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव चार महिन्यापूर्वीच कांद्याला मिळाला असता तर शेतकऱ्यांचे साठवणुकीत झालेले ४० टक्क्यांचे नुकसान टळले असते. आमदार दिलीप बनकर यांनी शरद पवार यांच्याकडे कांद्याच्या बाजारभावाबाबत प्रश्‍न मांडला, तेव्हा शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकाराला दोन लाख टन कांदा खरेदी करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी नमूद केले.

समिताला प्रोत्साहन द्यावे

आमदार पवार म्हणाले, की आमदार दिलीप बनकर यांच्यामुळे पिंपळगाव बाजार समितीने पारदर्शक कामकाजाच्या बळावर शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. शेतकरी केंद्रबिंदू मानणाऱ्या पिंपळगाव बाजार समिती सारख्या संस्थांना शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेची कामकाज इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी आमदार दिलीप बनकर, सोहनलाल भंडारी, माजी सरपंच महेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते.

तरुणांमध्ये आस्था...

आमदार पवार यांची साधी राहणी शेतकरी व तरुणांना भावली. कांदा व टोमॅटो उत्पादकांशी त्यांनी लिलावाप्रसंगी मुक्त संवाद केला. किती क्षेत्र आहे, खर्च किती आला, उत्पन्न किती...असा संवाद साधत त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर चर्चा केली. लिलावाची पद्धत समजून घेतली. त्यांच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी तरूणांनी पवार यांच्या भोवती गराडा घातला होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com