Ajit Pawar: अजित पवार पुन्हा सुटले म्हणाले, 'देवळात वाजवायला घंटाही दिला नाही'

Ajit Pawar At Sinnar Jan Sanman Yatra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सिन्नर येथे आली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपण केलेल्या कामकाजाचे जोरदार समर्थन केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे जोरदार समर्थन केले. याबाबत विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा आज सिन्नर येथे आली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपण केलेल्या कामकाजाचे जोरदार समर्थन केले. लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांच्या कल्याणासाठी माइलस्टोन आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्या आर्थिक तरतुदीतूनच महिलांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे याबाबत विरोधक करीत असलेला अपप्रचार अनाठाई आहे. त्याचा काहीही प्रभाव महिलांवर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

'विरोधक करीत असलेली टीका मी गांभीर्याने घेत नाही, विरोधक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. त्यामुळे त्यांना पंधराशे रुपयांचे महत्त्व कसे कळणार, असा प्रश्न त्यांनी केला. राज्यातील गरीब महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये खूप मोठी मदत ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Ajit Pawar
Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

यावेळी ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या आक्रमक मोडमध्ये आल्याचे दिसले. विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, "मी गेली दहा वर्ष अर्थमंत्री आहे. दहा वेळा राज्याचे बजेट सादर केले आहे. बजेट सादर करणे काय असते, हे विरोधकांना कळणार नाही. ते येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. विरोधक सत्तेत होते, तेव्हा त्यांनी जनतेला काय दिले?. काहीही दिले नाही. अगदी देवळात वाजवायला घंटाही दिल्या नाही, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. आम्ही राज्यासाठी चांगले औद्योगिक प्रकल्प आणत आहोत. संभाजीनगरसाठी दोन चांगले प्रकल्प येत आहेत. सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.

Ajit Pawar
Udayanraje Bhonsle : साताऱ्यात मोठी घडामोड, सुधा मूर्तींनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट; नवीन प्रकल्प की..?

जिंदाल औद्योगिक समूहाचे दोन प्रकल्प राज्याबाहेर जाणार होते. हे प्रकल्प आम्ही संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) मंजूर केले आहेत. त्यातून संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. त्या परिसराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी सिन्नरला औद्योगिक वसाहतीसाठी खूप परिश्रम केले. त्यातून येथे औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सिन्नरला नवी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे प्रयत्नशील असतात.

आमदार कोकाटे यांनी माझ्याकडे सातत्याने विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे. त्यांनी मतदारसंघासाठी एका स्मारकाची मागणी केली आहे. लवकरच त्यावर काम होईल. स्मारकाला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com