Raj Thackrey Politics: भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट!

Devayani Pharande; BJP leader Pharande's courtesy visit with Raj Thackrey-राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात आमदार फरांदे यांनी केली आगामी सिंहस्थ आणि राजकीय स्थितीची चर्चा
Devyani Pharande, Raj Thackeray & MNS Office bearers
Devyani Pharande, Raj Thackeray & MNS Office bearersSarkarnama
Published on
Updated on

Devyani Pharande News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे आज नाशिकला आगमन झाले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाकरे यांनी पत्रकारांची संवाद साधने टाळले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे पहिल्यांदाच नाशिकला आले होते. विधानसभा निवडणुकीत आमदार फरांदे यांच्या मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली होती.

Devyani Pharande, Raj Thackeray & MNS Office bearers
Trimbakeshwar Dindi: निवृत्तीनाथ दिंडीच्या सेवेच्या परंपरेतून "एक है तो, सेफ है" ला कडक उत्तर!

शहरात २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आगामी काळात नाशिक शहरात महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या दृष्टीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. ही सदीच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

Devyani Pharande, Raj Thackeray & MNS Office bearers
Rohit Pawar Politics: रोहित पवार यांचा देवाभाऊंना चिमटा, कंपन्या शेजारी आणि करार दावोसला?

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. अनेक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्ते, नेत्यांचे इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. विशेषत: माजी नगरसेवक आणि महापालिकेचे इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत.

वरिष्ठ नेत्यांकडून नाशिक शहरातील राजकीय स्थितीबाबत आढावा घेतला जात आहे. त्या दृष्टीने आमदार फरांदे यांच्याशी ठाकरे यांची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच अन्य उपक्रमांबाबत माहिती दिल्याचेही त्या म्हणाल्या.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात आज त्यांनी शहराच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. ही चर्चा बंद दारावर झाल्याने त्यात नेमके काय घडले याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

मनसे प्रमुख ठाकरे यांनी गेले काही महिन्यात भारतीय जनता पक्षाशी सलगी केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून देखील मनसेला महापालिका निवडणुकीत बरोबर घेण्याची तयारी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत नाशिक मध्ये मनसे आणि महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार का, याची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com