देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ईमेलवरील निमंत्रण!

इंदिरानगर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना बल्लाळ कुटुंब.
Ballal family welcomes devendra Fadanvis
Ballal family welcomes devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

नाशिक: भाजपचे (BJP) जुने कार्यकर्ते आणि बल्लाळ ॲकॅडमीचे संचालक अविनाश बल्लाळ यांनी आपल्या नवीन शैक्षणिक संकुलाला (Nashik) भेट द्यावी, असा एक साधा मेल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठविला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसातच श्री. फडणवीस बल्लाळ कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाल्याने अख्खे बल्लाळ कुटुंब भारावून गेले.

Ballal family welcomes devendra Fadanvis
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

श्री. बल्लाळ यांनी फडणवीस यांच्या वैयक्तिक मेलवर त्यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती पाठवून संकुलाला भेट द्यावी, अशी विनंती केली होती. फडणवीस यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक वानखेडे यांना याबाबत सांगितले. बल्लाळ यांनी वानखेडे यांना फोनद्वारे सविस्तर पुन्हा एकदा माहिती दिली. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फडणवीस यांनी थेट चार्वाक चौकातील बल्लाळ संकुलाला भेट दिली. त्यामुळे संपूर्ण बल्लाळ कुटुंबीय भावुक झाले होते.

Ballal family welcomes devendra Fadanvis
काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीयमंत्री पंडित सुख राम यांचे निधन

सर्वांशी कौटुंबिक गप्पा मारत सुरू असलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कामाचे त्यांनी माहिती घेतली आणि यापुढेदेखील याच प्रकारे काम सुरू ठेवून भरीव काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी दिलीप बल्लाळ, दीपाली बल्लाळ, आशा बल्लाळ, अनघा बल्लाळ, शार्दूल बल्लाळ, शर्वरी बल्लाळ यांनी फडणवीस यांचा सत्कार केला. या वेळी विवेक बोबडे, नीता बोबडे, स्मिता देशपांडे, पूर्वा देशपांडे, वरद देशपांडे, मधुकर देशपांडे, शरदिनी देशपांडे आदींसह आप्तेष्ट उपस्थित होते.

फडणवीस यांच्यासोबत माजी पालकमंत्री गिरीश महाजन, ॲड. जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, ॲड. अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, राजश्री शौचे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com