Rohit Pawar News : निलंबनाने काय होणार?, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे!

Lathicharge on Maratha Hunger Strikers - आमदार रोहित पवार म्हणाले, यंदा केंद्रात `इंडिया` आघाडीमुळे सत्तापरिवर्तन अटळ आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar on Jalna case : अत्यंत उग्र दडपशाही, हुकूमशाही आणि सत्तेचा दुरूपयोग यामुळे राज्यासह देशात भाजपविरोधात वातावरण आहे. त्याची जाणीव या पक्षाच्या नेत्यांना असल्याने त्यांना सत्ता जाण्याची भीती आहे. येत्या निवडणुकीत देशात सत्तापरिवर्तन अटळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. (NCP leader Rohit Pawar deemands resignation of Home minister Devendra Fadanvis)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल धुळे (Dhule) येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जालना येथील लाठीमाराच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांना टिकेचे लक्ष्य केले.

Rohit Pawar
Pankaja Munde News: घर शिवसेनेचे, मफलर राष्ट्रवादीची अन् सत्कार भाजपच्या पंकजा मुंडेंचा!

आमदार पवार म्हणाले, भाजपला सत्ता जाण्याची प्रचंड धास्ती आहे. त्यामुळे ते अन्य पक्ष आणि नेत्यांचे कुटुंब फोडत आहेत. यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचले आहे. त्यामुळे इंडिया संघटनातून २०२४ मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा आमदार पवार यांनी केला.

सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे नेते राज्यव्यापी दौरा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार धुळे येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित होते.

Rohit Pawar
Manoj Jarange News | 'आधी जी आर, मगच उपोषण मागे,' जरांगे पाटील भूमिकेवर ठाम | Maratha Protest |

जालना येथे ८ सप्टेंबरला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला अडथळा नको म्हणून मराठा समाज आरक्षणप्रश्‍नी आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनावेळी ५० पोलिस, तर लाठीहल्ला वेळी ५०० पोलिस, असे कसे? सुरवातीला दगडफेक नाही तर लाठीहल्ला झाला. सरकार खोटे बोलत आहे.

पोलिस अधीक्षकांना निलंबित करून साध्य काय होणार? लाठीहल्ल्याचा निर्णय तर मंत्र्यांनी घेतला. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, सरकारने माफी मागावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली. आगामी निवडणुकीत या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
Vijay Wadettiwar News | OBC आरक्षणाचा मुद्दा येताच भडकले वडेट्टीवार |

आमदार पवार म्हणाले, राज्याचे राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. पैशांचा अतिरेकी वापर होत आहे. अधिवेशनात जनतेच्या प्रश्‍नांवर भाजप बोलत नाही. पालकमंत्री धुळे जिल्ह्यात कधी फिरकत नाही. मग जनतेचे प्रश्न सुटतील कसे? रोजगारासह कापसाला चांगला दर नाही, रखडलेली शिक्षक भरती, इतर भरती प्रक्रियांसाठी हजार रुपये शुल्क आकारणी आदींसारखे प्रश्‍न सत्ताधारी भाजप का सोडवित नाही?

यावेळी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार जयदेव गायकवाड, विद्या चव्हाण, रविकांत वर्पे, राज राजापूरकर, विकास लवांदे, संदीप बेडसे, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, निरीक्षक उमेश पाटील, जितेंद्र मराठे, रणजित भोसले, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, उषा पाटील, शकिला बक्ष, कविता म्हेत्रे, ललित वारुडे, वाल्मीक मराठे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com