Pankaja Munde News: घर शिवसेनेचे, मफलर राष्ट्रवादीची अन् सत्कार भाजपच्या पंकजा मुंडेंचा!

Shivsena, NCP & Congress followers welcome Pankaja Munde- येवला येथे शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांच्या निवासस्थानी घड्याळाची मफलर टाकताच मुंडे खळखळून हसल्या.
Pankaja Munde at Yeola
Pankaja Munde at YeolaSarkarnama

Nashik News : सध्या भारतीय जनता पक्षात राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे राज्याच्या दौरा करीत आहेत. त्या सोमवारी येवला येथे आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपपेक्षा समाजाचे व अन्य पक्षाचेच पुढे होते. यावेळी शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निवासस्थानी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीची मफलर देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांसह पंकजा यादेखील गोंधळात पडल्या. (Pankaja munde arrived in yeola yesterday for her Shivshakti parikrama)

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी काल येवला येथे भेट दिला. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) आमदार नरेंद्र दराडे यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Pankaja Munde at Yeola
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंची तोफ लवकरच श्रीगोंद्यात धडाडणार

मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्या विविध देवस्थांनांना भेटी देऊन देवदर्शन घेत आहेत. सोमवारी त्या येवल्यात होत्या. त्यांच्या स्वागतासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाही (ठाकरे) पुढे सरसवलेली दिसली. राष्ट्रवादीच्या सत्कार सोहळ्यात घड्याळाची मफलर त्यांच्या गळ्यात कार्यकर्त्यांनी टाकली, तेव्हा पंकजाताईंनाही खळखळून आलेले हसू आवरता आले नाही.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विंचूर चौफुलीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून ढोल-ताशांच्या गजत स्वागत केले. चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. अमृता पवार, जिल्हा कोशाध्यक्ष प्रमोद सस्कर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, राजूसिंग परदेशी, मनोज दिवटे, दत्तात्रय सानप आदील यावेळी उपस्थित होते. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, बाजार समितीचे सभापती किसन धनगे, राधाकिसन सोनवणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांचे स्वागत केले.

Pankaja Munde at Yeola
Devendra Fadanvis Case : फडणवीसांवरील खटल्याचा ८ सप्टेंबरला निकाल ; वाचा, काय आहे प्रकरण?

पंकजा मुंडे आमदार दराडे बंधूंच्या निवासस्थानी गेल्या. आमदार नरेंद्र दराडे व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, प्रियंका काकड, डॉ. सुधीर जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com