देवेंद्र फडणवीसांनी मतदारांपुढे ठेवले निर्मल नाशिकचे स्वप्न!

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावा.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नाशिक : शहरे वाढत असताना उद्याने ऑक्सिजन पार्क झाली पाहिजे. सतरा एकर जागेतील उद्यान प्रभागासाठी फुफ्फुसे ठरतील, असे गौरवोद्‌गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काढले. निर्मल नाशिक (Nashik) संकल्पनेला चालना देण्यासाठी ग्रीन ट्रान्स्पोर्ट (Green Transport) यंत्रणा कार्यान्वित करणार असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
उपनेते सुनील बागूल यांच्या स्वकीयांचा भगवा कोणता? शिवसेनेचा की भाजपचा?

प्रभाग नऊचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचे उद्‌घाटन त्यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

Devendra Fadanvis
खडसेंची कोपरखळी; गुलाबराव पाटलांनी अभ्यास करून बोलावे!

ते म्हणाले, मोकळ्या जागांवर खासगी बांधकामे होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात, परंतु लोकांसाठी जागा विकसित करून नगरसेवक पाटील यांनी आदर्श निर्माण केला आहे. वसंतराव कानेटकर उद्यान उभे करून नाशिककरांना ऑक्सिजन पुरवणारी फुफ्फुसेच दिली असून या विकासकामांना दिलेल्या नावामुळे समाज समाजात भक्ती सेवा, राष्ट्र गौरव जागा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाची ओळख करून दिली. १७६ देशांत योगाचा प्रचार होत आहे. त्याच धर्तीवर हे योगा हॉल निश्चितच नागरिकांच्या स्वास्थ्याचे रक्षण करील. दिनकर पाटील यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

नाशिकला भाजपची सत्ता येणार ती आली तर निर्मळ नाशिक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. तीन महिन्यापूर्वी वीस एकर भूखंडावर कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी शाळेचे उद्‌घाटन केल्याचे अधोरेखित केले.

यावेळी भाजप प्रभारी आमदार जयकुमार रावल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, उपमहापौर भिकूबाई बागूल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड, नगरसेवक रवींद्र देवरे, अमोल पाटील, नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, रामहरी संभेराव, संजय राऊत आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com