Nashik News : देवेंद्र फडणवीसांची मेट्रो अडकली तरी कुठे?

Devendra Fadanvis`s Neo metro deadline is over but still not seen-नाशिक शहरासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली `मेट्रो निओ`प्रत्यक्षात तरी येईल का?
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis News : नाशिक महापालिका निवडणुकीत शहरासाठी मेट्रोची घोषणा केली होती. त्यानंतर विविध कार्यक्रमात त्याचा पुनरुच्चार झाला. आता ही डेडलाईन संपली, मात्र मेट्रो नीओ प्रत्यक्षात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. (BJP leader Devendra Fadanvis had made announcement of metro for Nashik)

नाशिक (Nashik) महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) सत्ता आल्यास शहरासाठी मेट्रो सुरू करू अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली होती.

Devendra Fadanvis
Malegaon News : मतदारसंघाताल दुष्काळाने पालकमंत्री दादा भुसे अडचणीत?

केंद्रीय अर्थसंकल्पात २०२१ मध्ये मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा करताना २०९२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद रण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत प्रकल्पाच्या कामाचे सोडाच मेट्रो संदर्भात एकही बैठक झालेली नाही. आता डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदतदेखील संपुष्टात येत असल्याने मेट्रो निओ प्रकल्पासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

महापालिकेलादेखील यासंदर्भात विचारणा होत असल्याने अखेरीस महामेट्रोने दाद देत गंगापूर व चेहेडी येथे डेपोसाठी जागा देण्याची मागणी करून महापालिकेला अडचणीत टाकले आहे. वेगाने वाढणाऱ्या या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नाशिकला पारंपरिक मेट्रोऐवजी एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प दिला. टायरबेस मेट्रोचा देशातील पहिलाच प्रकल्प नाशिकला होणार असल्याने नाशिककरांची उत्सुकतादेखील वाढली.

Devendra Fadanvis
Mahavikas Aghadi : नाशिक मतदारसंघावर काँग्रेस नव्हे तर शिवसेनेचा दावा!

या प्रकल्पाची किंमत २०१९ कोटी रुपये ग्राह्य धरण्यात आली. त्या वेळी बांधकाम साहित्याच्या दरानुसार किंमत निश्चित केली होती. परंतु तीन वर्षात बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने प्रकल्पाची किंमतदेखील वाढणार आहे. त्यामुळे राज्याचा हा प्रस्ताव धुळ खात पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक घोषणा फसवी ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com