Mahavikas Aghadi : नाशिक मतदारसंघावर काँग्रेस नव्हे तर शिवसेनेचा दावा!

Shivsena Thackeray Group said we will fight in Nashik loksabha constituency-नाशिक लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्याने शिवसेनेचे नेते संतापले
Vijay Karanjkar & Dr. Ulhas Patil
Vijay Karanjkar & Dr. Ulhas PatilSarkarnama

Nashik Shivsena News : महाविकास आघाडीचा घटक असताना काँग्रेसने परस्पर नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेचे नेते संतप्त झाले असून, काँग्रेसचा नव्हे तर शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Disputes in Mahavikas Aghadi about Nashik loksabha Constituency)

काँग्रेसच्या (Congress) निर्णयाला थेट विरोध झाला आहे. नाशिक (Nashik) मतदारसंघात शिवसेना (Shivsena) आपला उमेदवार देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

Vijay Karanjkar & Dr. Ulhas Patil
MU Senate Election : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती; कारण मात्र गुलदस्त्यात..

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली आहे. याबाबत विविध दावे-प्रतीदावे केले जात आहेत. मागील आठवड्यात काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दोन्ही जागा लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीची वरीष्ठ समिती कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवारी करणार हा जागावाटपाचा निर्णय घेणार आहे. असताना काँग्रेसने परस्पर अशी घोषणा करणे योग्य नाही. त्याने वाद-विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना-भाजप युती असताना देखील हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. १९९६ पासून येथे शिवसेनेचा उमेदवार असतो.

Vijay Karanjkar & Dr. Ulhas Patil
BJP - Shivsena Political News : कल्याण पूर्वेत भाजप - शिंदे गट समोरासमोर आलेच नाही; पोलिसांनी रोखली सेनेची वाट

१९९६ पासून सर्व निवडणुकांत येथे शिवसेनेचा उमेदवार राहिला आहे. १९९६ मध्ये राजाभाऊ गोडसे, १९९९ मध्ये अॅड. उत्तमराव ढिकले, २०१४ आणि २०१९ मध्ये हेमंत गोडसे येथून शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत देखील शिवसेना (ठाकरे गट) येथे दावा करणार आहे, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले.

मागील दिड वर्षात राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचा एक मोठा गट फुटून सत्तेत सहभागी झाला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा गट देखील फुटून सत्तेत सहभागी झाला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या बाजूने जणाधार वाढत आहे. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील बाजी मारल्यानंतर काँग्रेसच्या सत्तेच्या अनुषंगाने महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत.

Vijay Karanjkar & Dr. Ulhas Patil
Eknath Shinde Banners : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा; कार्यकर्ते म्हणतात...

राज्याच्या राजकारणामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला स्थान मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निरीक्षक म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती केली आहे. डॉ. पाटील यांनी नुकतीच नियुक्तीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये काँग्रेस भवन येथे बैठक घेतली. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची घोषणा पाटील केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com