Chief justice Bhushan Gavai: सरन्यायाधीश गवई प्रकरण; आता बार कौन्सिलचा मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टीमेटम!

Devendra fadnavis; Bar Commission jumps into Chief Justice's etiquette controversy, gives ultimatum to Chief Minister Devendra Fadnavis-महाराष्ट्र बार कौन्सिलने सरन्यायाधीश गवई प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला गंभीर इशारा.
CJI Bhushan Gavai & Devendra Fadanvis
CJI Bhushan Gavai & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Devendra fadnavis News: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे वादाचा विषय ठरला. याबाबत खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी इशारा दिला होता.

आता या प्रकरणात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी उडी घेतली आहे. कौन्सिलने हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. संदर्भात त्यांनी तातडीची बैठक घेऊन काही ठराव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कौन्सिलने केलेल्या ठरावांचा मसुदा आहे.

सरन्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक अनुपस्थित होत्या. हा राजशिष्टाचाराचा भंग असल्याचे लक्षात येताच सबंध यंत्रणेत खळबळ उडाली होती. उल्लेख सरन्यायाधीश गवई यांनीही केला.

CJI Bhushan Gavai & Devendra Fadanvis
Manikrao kokate News: छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कृषिमंत्री कोकाटेंनी मारली पलटी; आता म्हणतात...

त्यानंतर लगोलग पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि पोलीस आयुक्त यांनी हजेरी लावत दिलगिरी व्यक्त केली होती. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र अद्यापही हे प्रकरण मिटलेले नाही, हे स्पष्ट होते.

CJI Bhushan Gavai & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्हा परिषदेतील वर्चस्वाला कोणाचा अडथळा?

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड विठ्ठल कोंडे देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देशाचे सरन्यायाधीश गवई हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणाचा विषय होता. कौन्सिलने त्यांचा सत्कार केला त्या कार्यक्रमाला तीन हजाराहून अधिक वकील उपस्थित होते. मात्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो शिष्टाचार पाळलेला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः देखील वकील ते बार कौन्सिलचे सदस्य देखील आहेत, याचा आवर्जून उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर एक महिन्याच्या आत अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी. काय कारवाई केली याबाबत बार कौन्सिल ला कळविण्यात यावे. अन्यथा बार कौन्सिलला पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत पुढील कारवाई करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

सरन्यायाधीश गवई यांचा मुंबई दौरा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्यानंतर तातडीने व धावपळ करीत राज्य शासनाने सरन्यायाधीश गवई यांना राज्य अतिथी हा दर्जा बहाल केला. मात्र आता या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. थेट बार कौन्सिलने यात उडी घेतल्याने राज्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याची उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com