Mahayuti Politics: देवेंद्र फडणवीस शिवसेना उद्धव ठाकरेंना दमवणार, महापालिका निवडणूक अनिश्चित?

Devendra fadnavis; Chhagan Bhujbal route later to CM on OBC reservation case-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयातील याचिकांमुळे महापालिका निवडणुका रखडवणार?
Uddhav Thackrey & Devendra Fadanvis
Uddhav Thackrey & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena VS BJP: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील आरक्षणाचे प्रमाण किती? हे ठरत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाकडे आहेत.

ओबीसी आरक्षणाचे प्रमाण आणि लोकसंख्या यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल आहे. यामध्ये विशेष अनुमती याचिका १९७५६/२०२१ सर्वोच्च न्यायालयात आहे. यामध्ये बंठीया आयोगानुसार निवडणुकांबाबत शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र राज्य शासनाने यावरील वादामुळे राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.

Uddhav Thackrey & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal Politics : नाराजीची चर्चा सुरू असतानाच भुजबळ लागले कामाला; फडणवीसांना लिहिले पत्र

राज्यात नवे सरकार आल्यामुळे महापालिका निवडणुका होणार अशी एक चर्चा सुरू झाली आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात महत्त्वाचे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने तो अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेने जोरदार तयारी देखील केली आहे. महायुतीकडून त्यांना या निवडणुकीबाबत सतत हूल देण्याचे काम सुरू आहे.

Uddhav Thackrey & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal : भुजबळांची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, मविआ सरकारच्या काळातील 'ही' योजना यापुढेही सुरुच ठेवा...

सध्या राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक कामकाज पाहत आहेत. हे प्रशासक पालकमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली आणि सूचनेनुसार काम करतात. थोडक्यात अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला हवे तसे सर्व काम व लाभ होत आहे. त्यामुळे निवडणुका घेऊन मंत्री आणि राज्य सरकार आपले नियंत्रण कमी करणार का? हा मुख्य प्रश्न आहे.

महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता तूर्त तरी दिसत नाही. सध्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निष्कर्षानुसार बंठीया आयोगानुसार कारवाई करावी लागेल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षित ३२ हजार ९०७ जागा कमी होणार आहेत. त्यामुळे ओबीसी घटकांवर अन्याय होईल, अशी राजकीय पक्षांची भिती आहे.

महायुती सरकारने मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दोन्हीही उद्धव ठाकरे यांना अडचणीत कसे येतील या दृष्टीने काम करीत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या अनेक नगरसेवक आणि आमदारांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरू आहे.

या संदर्भात मोठे बहुमत असूनही महायुती मात्र विरोधी पक्षांमध्ये तोडफोड करण्यातच व्यस्त आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत महायुतीला आत्मविश्वास आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच कदाचित विरोधकांना जोर बैठका करायला लावून महायुती विरोधकांना विशेषतः उद्धव ठाकरे यांना दमवणार अशी शक्यता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com