Nilesh lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार निलेश लंके हे आपल्या साधेपणामुळे ओळखले जातात. थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून देखील त्यांचे कौतुक केले जाते. ते आमदार असताना आमदार निवासात कार्यकर्ते बेडवर झोपलेले आणि ते खाली अंथरुणावर जमिनीवर झोपल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा तसाच प्रकार नाशिकमधील रामशेज किल्ल्याच्या पायश्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला.
शनिवारी रात्री निलेश लंके यांनी आपला मुक्काम रामशेज किल्ल्याच्या पायश्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत केले. जमिनीवर अंथरुण टाकून ते आपल्या कार्यकर्त्यांसह झोपले. खास मोहिमेसाठी लंके रामशेज किल्ल्यावर आले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू केला आहे.त्या उपक्रमा अंतर्गत आज (रविवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाचे प्रतिक असलेल्या रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम तसेच संवर्धन आणि वृक्षारोपण उपक्रम राबवले जाणार आहेत.
विशेष म्हणजे मोहिमेसाठी खासदार लंके येणार असल्याने यांच्या स्वागताचे शनिवारी सायंकाळी जोरदार तयारी करण्यात आली होती. रामगृहावर त्यांच्यासाठी कक्षही राखीव ठेवण्यात आला होता. मात्र खासदार लंके आणि खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या साधेपणाचा प्रत्यय देत चक्क किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी (दिंडोरी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत मुक्काम केला. त्यांच्या या मुक्कामामुळे परिसरात वास्तव्याला आलेल्या मावळ्यांचाही हुरूप वाढला.
खासदार लंके यांच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील खासदार भास्कर भगरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे. हे सर्व नेते स्वयंसेवकांसह आज किल्ल्यावर आपली मोहीम राबवतील.
गेल्या काही महिन्यांपासून खासदार लंके यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. 'गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेवा'अशी घोषणा दिली आहे. मावळा संघटनेच्या पुढाकाराने हा उपक्रम होत आहे.
रामशेज हा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या परक्रमाची साक्ष देणाऱ्या आहे. या किल्ल्यावर औरंगजेबाच्या सरदाराने हल्ला केला. मात्र गडावरील मावळ्यांनी केवळ गोफणीतून दगड गोटे याचा मारा करीत या सैन्याला सव्वा दोन वर्ष झुंजवले होते. अखेर छत्रपतींचा आदेश आल्यावरच त्यांनी हा किल्ला सोडला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.