BJP Congress clash : सपकाळ महाराष्ट्रासाठी 'साप'; फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना, भाजप नेत्याची जीभ घसरली!

Devendra Fadnavis Criticism : BJP Vijay Chaudhari Replies to Congress Harshwardhan Sapkal in Nandurbar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपचे विजय चौधरी यांचं जोरदार प्रत्युत्तर.
 Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP Maharashtra : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठीचा दुसरा टप्पा सुरू आहे. अंतिम टप्प्याकडे प्रचार जात असतानाच, नेत्यांनी टीकेची पातळी देखील घसरू लागली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, त्यांना गजनी म्हटलं, तर सपकाळ यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, नंदुरबारचे भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी सपकाळ यांना साप म्हटलं.

भाजप नेत्याने थेट सापाची भाषा वापरल्याने, प्रचारातील भाषा पातळी घसरू लागल्याचे चित्र आहे. अंतिम टप्प्यात ही भाषा आणखी खालच्या पातळीवर जाईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती इथं पत्रकार परिषद घेतली. सपकाळ म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांची शॉर्ट टर्म मेमरी झालेली आहे. देवाभाऊंचा गजनी झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला ओळखू नका, सिरीयस घेऊ नका. मात्र त्यांच्यावरचे आरोप झालेले आहेत, त्या आरोपाच्या त्यांनी उत्तर द्यावे."

'समृद्धीवर भ्रष्टाचार, ड्रग्ज फॅक्टरी, वरली मटका, राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असून, सिरियसली घ्या. शेतकऱ्यांची (Farmer) कर्जमाफीचं आश्वासन दिलं, ते सिरीयसली घ्या. अजित पवारांना चक्की पीसिंग और पिसिंग म्हटलं होतं, ते सिरीयासली घ्या,' असा टोला सपकाळ यांनी फडणवीसांना लगावला.

 Harshwardhan Sapkal
Santosh Bangar : उमेदवार पाडा अन् 71 लाख जिंका; शिंदेंच्या शिलेदारानं पुन्हा ठोकली हाबूक!

फडणवीसांवर सपकाळ यांनी केलेल्या टीकेवर नंदुरबारचे भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, 'फडणवीस यांच्यावर टीका करण्याची सपकाळ यांची लायकी नाही. ज्या काँग्रेस नेत्यांनी आयुष्यभर टक्केवारीचे राजकारण करून महाराष्ट्राची तिजोरी लुटली, त्यांनी फडणवीसांसारख्या निष्कलंक नेत्यावर आरोप करणे हास्यास्पद आहे.'

 Harshwardhan Sapkal
Stray Dogs Counting Controversy : आधी गोंधळ उडवून दिला, शिक्षकांना कुत्रे मोजण्याची ऑर्डर काढली? आता अंगलट येताच, काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या भंपक कारभारावर ताशेरे!

'देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम करूनही, त्यांचे मुंबईत साधे स्वतःचे घर नाही किंवा त्यांची कोणतीही खासगी शिक्षण संस्था नाही. विरोधक आजवर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, हीच त्यांच्या पारदर्शक कारभाराची पोच पावती आहे,' असे विजय चौधरी यांनी म्हटले.

'हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्रासाठी साप असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा गाडा, अत्यंत कार्यक्षमतेने आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून चालवला आहे. अशा जनमानसातील नेत्यावर विनाकारण चिखलफेक केल्यास महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही. काँग्रेस नेत्यांनी आणि विशेषत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली मर्यादा ओळखून टीका करावी,' असा इशारा विजय चौधरी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com