Uddhav Thackeray : लग्न सोहळ्याच्या आडून शिंदे-फडणवीसांनी सोडले बाण, उद्धव ठाकरे घायाळ

Devendra Fadnavis and Eknath Shinde may deliver a political blow to Uddhav Thackeray in Nashik : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये खेळलेल्या खेळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये खेळलेल्या खेळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

उबाठा गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये असताना, उबाठाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या जोडीने हे दोन्ही नेते आपल्या गळाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिंदे फडणवीस यांच्या जोडीने नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवले आहे. विलास शिंदे हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेना फुटल्यानंतर ते उद्दव ठाकरे यांच्या गटासोबत राहीले. महानगरप्रमुख पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर सोपवली.

तर, बडगुजर यांचा सर्वांधिक संघर्ष भाजपशी झाला असून, एका गुन्ह्याच्या प्रकरणात बडगुजर कुटुंबीयाचे आलेले नाव व उबाठामध्ये संघटनात्मक पातळीवर झालेल्या बदलामुळे बडगुजर अस्वस्थ होते. त्यामुळे तेही अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लागला होता.

मात्र काल घडलेल्या घडामोडींमुळे विलास शिंदे व सुधाकर बडगुजर या दोघांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात दोघांना विचारले असता महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेतल्याचे बडगुजरांनी सांगितले तर विलास शिंदे यांनी राजकारणापलीकडे देखील संबंध असू शकतात असे सांगून स्पष्ट बोलण्याचे टाळले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Politics : समृद्धीच्या उद्घाटनचं ठिकाण बदललं... शिंदेंच्या ठाण्याला डावलत फडणवीसांचा इगतपुरीला मान

दरम्यान भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर असून येत्या आठ दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचे वक्तव करुन नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप होणर असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत हेही काल नाशिकमध्ये होते. विवाहसोहळा हा एक कौटुंबिक कार्यक्रम असतो, कुणाला बोलावायचे हा यजमानांचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

नाशिकमध्ये सिडको व सातपूरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे बडगुजर व शिंदे या दोघांना सोबत घेतल्यास त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक सोबत येतील. त्याचा मोठा फायदा पालिकेच्या निवडणुकीत करुन घेता येईल या विचारातून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांना महायुतीत सामावून घेण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास ठाकरे गटाला मोठा फटका बसेल. मात्र, याला महायुतीतून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण जुन्या जाणत्या-निष्ठावंत नेत्यांमध्ये आत्ताच अस्वस्थता जाणवू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com