Devendra Fadnavis : बैठक कुंभमेळ्याची, मात्र नाशिकच्या मंत्र्यांचा फडणवीसांना विसर?

Kumbh Mela Meeting Nashik : मुख्यमंत्री फडणवीस नाशिकचे मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या मंत्र्यांना निमंत्रणाचा विसर
Girish Mahajan & Devendra Fadanvis
Girish Mahajan & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिकला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या तयारीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्य शासनातर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी विशेष बैठक होईल. या बैठकीत नाशिकला होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीची चर्चा होणार आहे.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Sameer Bhujbal : येवल्याच्या पतंगाची दोर यंदा समीर भुजबळांच्या हाती!

सिंहास्थ कुंभमेळ्यात नाशिकच्या लोकप्रतिनिधी आणि संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्तीच झालेली नाही. त्या दृष्टीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे तसेच नरहरी झिरवाळ यांचा या बैठकीला निमंत्रितांत समावेश नाही. या विशेष बैठकीला २४ सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Satyajeet Tambe : नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नेत्यांनी दाखवला रेड सिग्नल!

मुंबईत बैठकीचे आयोजन करताना नाशिकच्या शहरातील चार आमदारांनाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे देवयानी फरांदे आणि ॲड राहुल ढिकले तसेच आमदार सरोज अहिरे यांनाही निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे नाशिकच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतीय जनता पक्षाचा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष पुढाकार आहे. २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नियोजन केले होते. त्यामुळे त्या संस्था कुंभमेळावर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव दिसून आला.

सध्या अलाहाबाद येथे महा कुंभमेळा पर्व सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा आहे. माध्यमांनी देखील त्याची विशेष दखल घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीची चर्चा होणे अपरिहार्य आहे.

सध्या प्रशासनातर्फे सहा ७०० कोटींचा प्राथमिक आराखडा संयुक्त कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्री नियुक्त करण्यात आलेल्या नाही. स्थानिक पातळीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांचे अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात सिंहस्थ कुंभमेळ्यावरून विकास आणि राजकीय चर्चा रंगात येण्याची शक्यता आहे. त्याला आता महायुतीच्या राजकारणाचाही स्पर्श होतो की काय अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com