Sameer Bhujbal : येवल्याच्या पतंगाची दोर यंदा समीर भुजबळांच्या हाती!

Makar Sankranti celebrations in Yeola : माजी खासदार समीर भुजबळांची येवल्याच्या पतंगोत्सवाला हजेरी
Sameer Bhujbal | Shephali Bhujbal
Sameer Bhujbal | Shephali BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Yeola News: माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेला येवला शहर पतंगोत्सवासाठी देशभर प्रसिद्ध आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात हजारो नागरिकांनी पतंग उडवले. प्रत्येक घराच्या छतावरील गर्दीत पतंगोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला.

माजी मंत्री छगन भुजबळ दरवर्षी येवल्यात पतंग उत्सवाला आवर्जून उपस्थित असतात. यावेळी ते मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या सहकारी आणि समर्थकांना आवर्जून देतात. यंदा मात्र ते मतदार संघात उपस्थित होते. मात्र त्यांनी पतंग उडवली नाही. विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.

Sameer Bhujbal | Shephali Bhujbal
Satyajeet Tambe : नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नेत्यांनी दाखवला रेड सिग्नल!

आज मकर संक्रांतीला माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात पतंगोत्सवात भाग घेतला. यावेळी त्यांनी पत्नी शेफाली भुजबळ यांच्यासह पतंग उडविण्याचा आनंद लुटला. यावेळी कार्यकर्त्यांमध्येही उत्साह होता. कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार भुजबळ यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे येवल्याच्या पतंगाचा दोर समीर भुजबळ यांच्या हाती असल्याचे चित्र पाहायला मिळाले

Sameer Bhujbal | Shephali Bhujbal
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या पक्ष विस्तारात अजितदादा घालणार खोडा?

माजी खासदार भुजबळ सध्या पक्षीय राजकारणात नाहीत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शेजारच्या नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती. या विविध वादविवादाने गाजलेल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नव्हते.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी शंभर टक्के विरोधकांचा पतंग कापणार आहे. मात्र सध्या राजकारणाविषयी फारसे काही बोलणार नाही. राजकीय संधी येथील तेव्हा नक्कीच त्याचा विचार करीन. सध्या मात्र उत्सव आहे आनंदाचे दिवस आहेत.

शेतकऱ्यांमध्येही आनंद आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच या उत्सवाचा आनंद घ्यावा असे सांगून त्यांनी राजकीय विषयावर बोलणे टाळले. भुजबळ आणि राजकारण हे एक समिकरण आहे. मात्र माजी खासदार भुजबळ यांनी राजकीय भाष्य टाळल्याने काहींची निराशा झाली.

माजी मंत्री भुजबळ यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या मतदार संघाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आपण अनेक विरोधकांचे पतंग कापले आहेत, असे सांगून आपल्या विरोधकांना सूचक इशारा दिला होता. सध्या मंत्रिमंडळात समावेश नसल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांचे विधानही चर्चेचा विषय बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com