Devendra Fadnavis News : नगरच्या नामांतराला फडणवीसांची विखेंच्या रॅलीतून फुंकर; नेमके काय म्हणाले?

Sujay Vikhe Patil And Lok Sabha Election: महायुती ही विकासाची गाडी आहे. मोदी हे त्याचे पाॅवरफुल इंजिन आहे. दुसरी गाडी राहुल गांधींची आहे. तेथे शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद, अखिलेश यादव, स्टॅलिन हे सर्वच इंजिन आहेत.
Devendra Fadnavis, Sujay Vikhe
Devendra Fadnavis, Sujay VikheSarkarnama

Ahmednagar Political News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने झालेल्या सभेत अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्याला पुन्हा एकदा फुंकर घातली. उपमुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर नामांतराची ही फुंकर नगर दक्षिणचे उमेदवार विखेंना कितपत यश मिळवून देते, याकडे आता लक्ष्य लागले आहे.

महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे Sujay Vikhe यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यानिमित्ताने नगर शहरातील चितळे रोडवर सभा झाली. तत्पूर्वी खासदार विखे यांनी नगर शहरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुतीमधील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचे स्वागत केले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'भारत माती की जय', 'जय भवानी, जय शिवाजी', या घोषणेने केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "होय, मी जाणीवपूर्व नगरला अहिल्यानगर म्हणतोय. कारण तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले आणि सुजय विखे खासदार झाले की, हे अहिल्यानगरच होणार आहे. फक्त दिल्लीचा निर्णय बाकी आहे. एकदा गाडी दिल्ली रवाना केली की, नगरचे नाव अहिल्यानगरच होणार आहे".

मोदी यांच्याकडे भारताचे तिसऱ्यांदा नेतृत्व देत आहोत. ही निवडणूक ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिका किंवा विधानसभेची नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. विखेंना मत म्हणजे मोदींना मत. म्हणजेच मोदींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Sujay Vikhe
Vishal Patil Rebel : सांगलीच्या रक्तात बंड; विशाल पाटलांनी काँग्रेस अन् पैलवानाचंही टेन्शन वाढवलं

तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकार आल्यावर देशातील तरुणाईला तीस लाखांपर्यंतचे लोन विना तारण देणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजलाम होत आहे. आता बलशाली भारतासाठी आणि सामान्य माणसाला विकासाची भेट देण्यासाठी महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे मतदारांनी सुजय यांच्यासारख्या तरुण व तडफदार युवकाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis, Sujay Vikhe
Ajit Pawar : सुजय विखेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादांची दांडी; तर भाजपचे शिंदेंच्या शिलेदारांकडे दुर्लक्ष

पारनेर तालुक्यातून आलेला मंगल कलश मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उमेदवार डॉ. सुजय विखे यांना देण्यात आला. या सभेस आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप, आमदार बबनराव पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाळासाहेब नाहाटा, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, सचिन जाधव उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रॅलीतून शक्तिप्रदर्शन

उमेदवार सुजय विखे यांनी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी सुजय विखे, राजेंद्र विखे, राम शिंदे, मोनिका राजळे, संग्राम जगताप आदी उपस्थित होते. यानंतर दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणखी एक अर्ज दाखल केला. सकाळी अर्ज भरल्यानंतर बस स्टँडजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Devendra Fadnavis, Sujay Vikhe
Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com