PM Modi Jalgaon Tour : '...यासाठी पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगावात येणार' ; फडणवीसांनी केलं स्पष्ट!

Devendra Fadnavis News : 'आता बचतगट हे केवळ कागदावरच असणार नाहीत, तर ते महिलांना सक्षम करण्याचं काम करतील.', असंही म्हणाले.
PM Modi
PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis at Jalgaon : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार प्रचाराला लागली आहे. दरम्यान, महायुतीने आज जळगावागत महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होती.

तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. याप्रसंगी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 ऑगस्टला पंतप्रधान मोदी हे जळगावात येणार असल्याचे सांगून, त्यामागचे कारणही स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशात महिला सक्षम होतात, तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मोदींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण सुरू केलं.'

PM Modi
Devendra Fadnavis : 'अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही; एकदा दिली की..' - फडणवीसांनी रवी राणा अन् महेश शिंदेंना सुनावलं?

तसेच 'आज आपण पाहतोय मोदींच्या(PM Modi) नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं. बचगटाच्या माध्यमातून मोदींनी लखपती दीदी हा कार्यक्रम आखला. तर गिरीश महाजनांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 15 लाख बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या. त्यांच्या सन्मानासाठी पंतप्रधान मोदी 25 तारखेला याच जळगावात येणार आहेत.

कोट्यवधी महिलांना लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात साडेसहा लाख बचतगटांच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलं आहे. 15 हजार कोटींचं कर्ज आपण दिलेलं आहे.' अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.

PM Modi
Kolhapur Vidhan Sabha Election: कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसमधील 26 जण इच्छुक!

याशिवाय 'मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. कारण, आमच्या माता-भगिनी, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत. एक पैसा त्या कर्जाचा बुडवत नाही. एकूण एक पैसा त्या परत करतात. म्हणूनच आता त्यांना सक्षम करण्यासाठी बाजारपेठ आणि व्यापारपेठ देखील, आपलं सरकार देत आहे. आता बचतगट हे केवळ कागदावरच असणार नाहीत, तर ते महिलांना सक्षम करण्याचं काम करतील. याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे, हे सांगताना मला आनंद वाटत आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com