Kolhapur Vidhan Sabha Election: कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसमधील 26 जण इच्छुक!

Congress and Kolhapur Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणूकलढवण्यासाठी इच्छुकांकडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती.
Kolhapur Vidhan Sabha Election
Kolhapur Vidhan Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष एक दिलाने लढणार असले तरी काँग्रेसकडून सर्वच मतदारसंघात चाचपणी करण्यात येत आहे. मतदारसंघातील प्रबळ उमेदवार आणि लोकाभिमुख चेहरा शोधण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या दहा मतदारसंघात काँग्रेसकडून 26 जण इच्छुक आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक(Vidhan Sabha Elction) लढवण्यासाठी इच्छुकांकडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसकडून जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 26 इच्छुकांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कडे अर्ज सुपूर्द केले आहेत. आपल्याला उमेदवारीची थेट मागणी पक्षाकड़े अधिकृतपणे केली असून दक्षिण शाहूवाडी आणि शिरोळ वगळता इतर मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

Kolhapur Vidhan Sabha Election
Kolhapur Vidhan sabha Election : कोल्हापुरातून महायुतीची तोफ धडाडणार, 20 ऑगस्टला विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एकमेव आमदार ऋतुराज पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर करवीर विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, कॅप्टन उत्तम पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे.

तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमधून आमदार जयश्री जाधव यांच्यासह शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्योगपती अनंत माने यांच्यासह सहा जणांनी मागणी कैली आहे.

Kolhapur Vidhan Sabha Election
Shivsena UBT : सांगलीतील संघर्षाचा पुढचा अंक कोल्हापुरात; ठाकरे गटाचा पाच जागांवर दावा

याशिवाय चंदगड विधानसभा मतदारसंघातून गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, अप्पी पाटील, किसनराव कुराडे, सोमनाथ आरबोळे हे काँग्रेस(Congress) कडून निवडणूक लढवण्यास तयार आहेत. राधानगरीतून भुदरगडचे माजी सभापती सचिन घोरपड़े, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील हे इच्छुक आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com