Bhaskar Bhagare Politics: एक रुपयात पिकविमा बंद, महायुती शेतकरी विरोधी असल्याची मुख्यमंत्र्यांनीच दिली कबुली?

Devendra Fadnavis;MP Bhaskar Bhagre's allegations, government admits to being anti-farmer -खासदार भास्कर भगरे म्हणाले, महायुती सरकारने एक रुपयात विमा योजना रद्द करणे ही फसवणूक
Bhaskar Bhagare & devendra Fadanvis
Bhaskar Bhagare & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Bhagare News: प्रत्येक निवडणुकीत एक रुपयात पिक विमा योजनेचा गाजावाजा महायुती सरकारने केला. त्याद्वारे शेतकऱ्यांची मते घेतली. निवडणुका जिंकल्या. त्यामुळे आता महायुतीला शेतकऱ्यांची गरज संपली, अशी स्थिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची घोषणा केली. योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज आल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे, हे त्याचे कारण त्यांनी सांगितले. या घोषणेने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

Bhaskar Bhagare & devendra Fadanvis
Harshvardhan Sapkal Politics: हर्षवर्धन सपकाळ यांनी नेत्यांना पुन्हा बजावले, ‘पहेलगाम’ घटनेवर वक्तव्य टाळा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी महायुती सरकार हे फसवणूक करणारे सरकार असल्याची टीका केली. या सरकारने एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नव्हे तर विमा कंपन्या पोहोचण्यासाठी आणली होती. आता शेतकऱ्यांचील गरज संपल्याने त्यांनी योजना मागे घेतली आहे, असे सांगितले.

Bhaskar Bhagare & devendra Fadanvis
Ajit Pawar Politics: ज्यांना मंत्री केले, त्याच नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली... जळगावचे दोन माजी मंत्री अजित पवारांच्या गोटात!

राज्य सरकारच्या या निर्णयातून महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे याची कबुलीच मिळाली आहे. दादा भुसे, अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे आणि सध्याचे माणिकराव कोकाटे अशा चार कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळातील हा विषय आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ९०० कोटी रुपये येणे आहे. त्यावर सरकारने मौन बाळगले आहे.

राज्य सरकारने या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीतून मोठा खर्च केला आहे. कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून किती विमा कंपन्यांनी पारदर्शी पद्धतीने कारभार करून शेतकऱ्यांचे विम्याचे दावे पूर्ण केले याचे उत्तर सरकारने अद्याप दिलेले नाही.

बनावट अर्ज आल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. हे सर्व अर्ज ऑनलाईन आलेले आहेत. त्यामुळे बनावट अर्ज कोणते, ते कोणी अपलोड केले, त्या दाव्याचे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले? हे सर्व ऑनलाईन उपलब्ध आहे. अशी फसवणूक करणाऱ्यांना राजकीय आशीर्वाद होता हे लपून राहिलेले नाही. त्यातील राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचे काम सरकार करीत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

या योजनेत प्रशासकीय स्तरावर तलाठी ते अधिकारी आणि अगदी मोठे राजकीय नेते यांनी देखील किती लूट केली आहे, हे वेळोवेळी प्रकाशात आले आहे. या संदर्भात विविध तक्रारी शासनाकडे प्रलंबित आहेत. मात्र शासनाने आपली कातडी वाचविण्यासाठी थेट शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. मध्ये राज्यातील दुष्काळ आणि कर्जाने अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांवर राज्य सरकारने आपल्या निर्णयाचा आसूड चालविला आहे, या निर्णयाचे फलित म्हणता येईल. सर्वच पक्ष आणि सर्वच नेते सत्ताधारी महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. दाद मागावी कुठे असा प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com