Harshvardhan Sapkal Politics: हर्षवर्धन सपकाळ यांनी नेत्यांना पुन्हा बजावले, ‘पहेलगाम’ घटनेवर वक्तव्य टाळा!

Harshvardhan Sapkal; Congress CWC resolution on Pahalgam is the official position of Congress -पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसमधील नेत्यांच्या विधानांतून भूमिकेतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर पडला आहे.
Harshwardhan-Sapkal-.jpg
Harshwardhan-Sapkal-.jpgSarkarnama
Published on
Updated on

Harshvardhan Sapkal News: पहेलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी हा संवेदनशील विषय बनला आहे. काँग्रेस नेत्यांनी मात्र यावर भिन्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे हा वाद भाजपच्या पत्त्यावर पडला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या नेत्यांना कडक शब्दात फटकारले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अनावश्यक प्रतिक्रिया टाळल्या पाहिजेत. पहेलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणावर कोणीही टिप्पणी करू नये असे त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले.

Harshwardhan-Sapkal-.jpg
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांचा रोख कोणावर?, माझ्या हातात असते तर, केव्हाच पालकमंत्री नेमला असता!

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात अतिशय समतोल व देशहिताची भूमिका बजावली आहे. काँग्रेस केंद्रीय कार्यकारणी समितीचा ठराव हीच अधिकृत काँग्रेसची भूमिका आहे. पोलीस पक्ष आपले वैयक्तिक आणि राजकीय हित बाजूला ठेवून देशाच्या हिताच्या दृष्टीने सरकारला पाठिंबा व सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Harshwardhan-Sapkal-.jpg
Waqf Bill Politics: पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर स्थगित केलेले वक्फ विरोधी आंदोलन देशभरात पुन्हा सुरू!

काँग्रेस नेत्यांच्या काही विधानांनी भाजपला टीका करण्याची आयती संधी मिळाली होती. त्यावर सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हा विषय आता थांबवला पाहिजे. देश म्हणून या विषयाकडे सगळ्यांनी पहावे. पुन्हा पुन्हा तोच खोडसाळपणा करू नये.

काँग्रेसची सद्भावना यात्रा मंगळवारी श्री सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरात झाली. त्यांनी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडून हिंदू- मुस्लिम आणि जाती धर्माच्या आधारावर होणारे विभाजन, वादग्रस्त वक्तव्य यांचा चांगलाच समाचार घेतला. पुरोगामी महाराष्ट्राला हे अजिबात अपेक्षित नाही. विरोधी पक्ष मात्र नेमके तेच करीत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केले.

राज्य शासनाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील पिढी त्यांना पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्याचे स्वागत केले. या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करू नये. फक्त घोषणा राहता कामा नये या विषयावर राजकीय टिप्पणी करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com