Nashik Kumbh Mela News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्याचा मुहूर्त सतत लांबत चालला आहे. या तारखा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच जाहीर करण्याचा साधूंचा हट्ट आहे. त्यामुळे एक नवा पेच निर्माण झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा विशेष दौरा केला होता. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन वेळा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला आहे. अद्यापही कोणती कामे केव्हा होणार याचे वेळापत्रक निश्चित होऊ शकलेले नाही.
या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही कुंभमेळ्याच्या कामकाजाबाबत टीका केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यात स्पर्धा असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली होती. यातून होणाऱ्या विलंबाला आता साधू महंतांनीही दुजोरा दिला आहे.
दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन आणि विकास आराखडा याच्या अंमलबजावणी बाबत विलंब होत आहे. हरिद्वार येथे झालेल्या बैठकीत नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्याचे निश्चित झाले होते. मात्र याबाबत विविध अडचणी आणि प्रश्न आहेत.
आखाडा परिषद आणि साधूंच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याचा आग्रह स्थानिक साधनचा आहे. त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच करण्याचा हट्ट साधूंनी धरला आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी पाठपुरावा करीत आहेत. दोन महिन्यांपासून विविध अडचणींमुळे मुख्यमंत्र्यांना वेळ देता आलेली नाही.
कुंभमेळा बाबत त्र्यंबकेश्वरला २७५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नाशिक साठी तेराशे कोटी रुपयांचा गोदावरी स्वच्छता आणि भुयारी गटार योजनेचा प्रकल्प आहे. मात्र या सर्व प्रकल्पांमध्ये अद्याप कोणतीही निविदा निघालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने साधू दोघेही नाराज आहेत.
या संदर्भात त्रंबकेश्वर येथील साधूंनी आपली नाराजी स्पष्टपणे कळविली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होत आहे. अनुसार पावसाळ्याचे सहा महिने वगळल्यास शासनाकडे फक्त एक वर्षांचा कालावधी आहे. या अल्प कालावधीत कुंभमेळ्याचे कामकाज कसे होणार असा प्रश्न त्र्यंबकेश्वरच्या षड्दर्शन आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.