Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीसांच्या परीक्षेत धुळ्याचे विशाल नरवडे ठरले नंबर वन!

Devendra Fadnavis;Vishal Narwade topped the Chief Minister's seven-point program-मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या अंमलबजावणी कार्यक्रमात धुळे जिल्हा परिषदेने घेतली राज्यात आघाडी.
CEO Vishal Narwade & CM Devendra Fadanvis
CEO Vishal Narwade & CM Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Vishal Narwade News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंबर दिवसांचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यानंतर सात कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. शंभर दिवसांच्या या अंमलबजावणी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सात कलमी कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे पहिले आले आहेत.

CEO Vishal Narwade & CM Devendra Fadanvis
Radhakrishna Vikhe Patil: काँग्रेसने विखेंना ठणकावले, ‘आधी पाणी तर द्या, मग स्मार्टमिटरचे बोला’

धुळ्याचे विशाल नरवडे यांनी अतिशय कल्पकतेने या कार्यक्रमाचे अंमलबजावणी केली. त्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश केला. या योजनांचा लाभ थेट नागरिकांना मिळावा यासाठी प्रशासन गतिमान केले. त्यामुळे त्यांनी केलेल्या सादरीकरणाने मुख्यमंत्री फडणवीस यांचं सर्वच वरिष्ठ प्रभावित झाले.

CEO Vishal Narwade & CM Devendra Fadanvis
Pune Rape Crime: योगेश कदमांनंतर आता भाजप मंत्र्यांचं स्वारगेट घटनेबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, अशा घटना घडतच असतात, कारवाई...

या संदर्भात राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत सात कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. राज्याच्या सर्व जिल्हा परिषद आणि महापालिकांनी त्याचे सादरीकरण केले. यामध्ये धुळे जिल्हा पहिला आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विशाल नरवडे यांचा विशेष गौरव केला. त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

धुळे जिल्हा परिषदेचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारे संकेतस्थळ तयार करणारे धुळे हे चौथे ठरले. ते नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. ग्रामविकास विभागाच्या सात सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांनी विभागांतर्गत या सेवांची उपलब्धता सुलभ केली आहे.

ग्रामीण भागात नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेने नऊ उपक्रम राबविले आहे. यामध्ये कार्यालयीन स्वच्छता उपक्रमासह स्वच्छतेची पंचसूत्री तयार करण्यात आली आहे. जुन्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली.

तक्रार निवारण उपक्रमात स्वतंत्र पोर्टल निर्माण करण्यात आले. त्यात सर्वाधिक ३४९ तक्रारींचे निवारण करण्यात आले. अभ्यंगत आणि नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिन प्रभावी करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्ह्यात या सुविधांची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे. यावर देखील पर्यवेक्षण करण्यात आले.

धुळे जिल्हा परिषदेने ई- ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात आला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात भेटी देऊन त्याची खातरजमा केली. आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात श्री नरवडे यांनी पुढाकार घेतला. त्यात लक्षणीय यश मिळविल्याने श्री नरवडे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्तिशः कौतुक केले आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com