BJP Politics: नाशिकमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच सिनिअर आमदार; पण मंत्रिमंडळात पाटी कोरीच! अजित पवार, एकनाथ शिंदे तुपाशी

Nashik BJP News: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये सहा महिन्यांचा अपवाद वगळता ते सलग राज्याचे मंत्री राहिले आहेत.
Rahul Dhikle, Seema Hiray, Devyani Pharande & Dr Rahul Aher
Rahul Dhikle, Seema Hiray, Devyani Pharande & Dr Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये सहा महिन्यांचा अपवाद वगळता ते सलग राज्याचे मंत्री राहिले आहेत. नाशिकचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी म्हणून ते विशेष आहे.

राज्यात यंदा मोठ्या बहुमताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आहे. कुठे बहुमत मिळाले ही सोय की गैरसोय हा मोठा राजकीय प्रश्न आहे. त्याचा फटका थेट भाजपच्या निष्ठावंत आणि ज्येष्ठ आमदारांनाच बसल्याने तो चर्चेचा विषय आहे.

यंदाच्या मंत्रिमंडळात सातारा आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचे प्रत्येकी चार आमदार आहेत. साताऱ्याचे जयकुमार गोरे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई हे चार मंत्री आहेत. नाशिकचे छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चौघे मंत्रिमंडळात आहेत.

Rahul Dhikle, Seema Hiray, Devyani Pharande & Dr Rahul Aher
Dada Bhuse Politics: दादा भुसे धावले पक्षाच्या मदतीला, म्हणाले, "शिवसेनेत गटबाजी नाही"

या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा अनुभवी मंत्र्यांच्या सहभागाने प्रभाव वाढू शकतो. १५ पैकी १४ आमदार महायुतीचे आहेत. यामध्ये सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन आमदार असताना एक मंत्री आहे.

यापूर्वी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले या तिघांचीही संभाव्य मंत्री म्हणून नावे चर्चेत होती. डॉ राहुल आहेर यांच्या चांदवड येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्ही राहुल आहेत यांना निवडून द्या. तुम्ही तुमचे काम केले की, मी त्यांना मंत्री करायचे काम करीन असे जाहीर आश्वासनच दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते आश्वासन हवेतच विरले असे म्हणावे लागेल.

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या १३५ आमदारांच्या बळावर सरकार सत्तेत आहे. गेल्या निवडणुकीत देखील भाजपच्या ११० आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्वात होते. मात्र या दोन्ही वेळी भाजपचे पाच आमदार असताना या जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक दोन्हींची भाजपने निराशाच केली आहे.

शेजारच्या जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे मोजके आमदार आहेत. मात्र एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्या निमित्ताने भाजपने जळगाव जिल्हा दत्तक घेतल्यासारखीच स्थिती आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव जिल्ह्याला वजनदार खाती मिळाली आहेत. नाशिकचे पालकमंत्री पदही पुन्हा एकदा जळगावला जाते की काय अशीच चर्चा आहे. नाशिकचे भाजपचे नेतृत्व केव्हा भरारी घेईल, हे अनिश्चितच आहे.

नाशिक जिल्ह्याला (कै) पोपटराव हिरे, (कै) गणपतराव काठे, (कै) बंडोपंत जोशी, माजी मंत्री (कै) डॉ. डी. एस. आहेर अशा दिग्गज नेत्यांनी भाजपचे नेतृत्व केले होते. या नेत्यांना राज्यात वरिष्ठांकडे पत आणि शब्दाला किंमत होती. आज नाशिकचे प्रतिनिधित्व करेल किंवा त्याच्या शब्दाला राज्याचे नेतृत्व महत्व देईल, असा नेता नाशिक मध्ये नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजपचे शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष हे तर स्वतःला तरी न्याय मिळवून देतील का? असे खाजगीत बोलले जाते. तीच गत प्रदेश नेत्यांची देखील आहे. त्यामुळेच आज जिल्ह्याला चौथा मंत्री मिळाला, मात्र पाच आणदार असलेल्या भाजपची पाटी कोरीच राहिली, अशी स्थिती आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com