Devidas Pingle Politics: अविश्वास प्रस्ताव: सुरत, गुवाहाटी नव्हे; बाजार समितीचे संचालक थेट दुबईत?

Devidas Pingle; Girish Mahajan effect, no-confidence drama in Nashik APMC against Devidas Pingle again-उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक देविदास पिंगळे विरोधात अविश्वास प्रस्तावासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची एन्ट्री
Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Devidas Pingle & Shivaji ChumbhaleSarkarnama
Published on
Updated on

Pingle Vs Chumbhale News: उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी फुटीर आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. मात्र नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीला खाली खेचण्यासाठी संचालक थेट दुबईला गेले आहेत. एका बाजार समितीत एवढे आहे तरी काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचे नियुक्ती जवळपास नक्की झाली आहे. त्याचा पहिला राजकीय इफेक्ट नाशिक बाजार समितीवर पडला आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू देविदास पिंगळे यांची सत्ता खेचण्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी शिवाजी चुंभळे यांच्या माध्यमातून डाव टाकला आहे

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Chhagan Bhujbal News : इथं तर मै रहना ना? का नही रहना? छगन भुजबळांची नाराजी कायम

उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे नेते नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यात पंधरा संचालकांनी सह्या केल्या आहेत. यामध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवाजी चुंभळे यांच्या माध्यमातून तो आला आहे.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Kanifnath Yatra Controversy : 'मुख्यमंत्रीसाहेब, ऐका हो, इकडं लक्ष द्या ओ'; शरद पवारांचा शिलेदार झाला आक्रमक

माजी खासदार पिंगळे गटाचे दहा संचालक या निमित्ताने बंडखोर गटाला मिळाले आहेत. या गटाला मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या पायलट आणि पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केले. जिल्हाधिकारी लवकरच याबाबत पुढील कार्यवाही करतील.

सभापती पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आहे. या निमित्ताने भाजप विरुद्ध अजित पवार असे राजकीय चित्र पाहायला मिळते आहे. विरोधकांना मिळालेल्या या दहा संचालकांना आपल्याकडे खेचण्यासाठी पाच "खोके" खर्ची पडले आहेत, असे बोलले जाते. त्यात मंत्री महाजन आणि संभाव्य सभापती चुंबळे यांनी परिश्रम घेतले, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

दरम्यान चुंभळे यांच्याकडे वळविलेल्या संचालकांचे परतीचे दोर कापण्यात आले आहेत. त्यासाठी या संचालकांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले आहेत. हे सर्व संचालक सोमवारी सायंकाळी मुंबईमार्गे थेट दुबईला रवाना करण्यात आल्याचा दावा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी केला आहे.

नाशिक बाजार समिती ही राज्यातील आघाडीची बाजार समिती आहे. मात्र त्यामध्ये एवढे काय दडले आहे की, त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेले अनेक वर्ष सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात यापुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात श्री. पिंगळे यांना काही कारागृहात देखील जावे लागले होते.

यासबंध राजकीय घडामोडींमध्ये नाशिक बाजार समितीसाठी मंत्र्यांसह अनेक जण कामाला लागल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यात महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. पिंगळे यांच्या विरोधात भाजपमध्ये प्रवेश केलेले चुंभळे असे चित्र आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांतील राजकीय ओढाताण दिसते आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com