
Maharashtra Budget Session 2025 : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी न मिळालेले ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी संस्थापक सदस्य छगन भुजबळांची नाराजी कायम आहे.
संधी न मिळाल्याने भुजबळ यांचा 'जहां नहीं चैना वहां नहीं रहना', हा डायलाॅग चांगलाच गाजला होता. यानंतर ते नागपूर इथं आणि आता मुंबईत होत असलेल्या महायुती सरकारच्या अधिवेशनात नाराजीनेच सहभागी झाले.
महायुती सरकारचे मुंबई इथं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरून पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. या अधिवेशनात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांची नाराजी कायम असल्याचे दाखवले.
छगन भुजबळांना 'जहां नहीं चैना वहां नहीं रहना' या डायलाॅगची आठवण करून दिल्यावर, ते म्हणाले, इथं तर मैं रहना ना? का नही रहना? मग काय आता? असा प्रतिसवाल केला. नाराजी दूर झाली का? अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संपर्क झाला होता का? यावर भुजबळ यांनी त्यांचा फोन आला होता, असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला पाहिजे का? यावर बोलताना छगन भुजबळ यांनी महायुतीच्या कारभाऱ्यांकडे बोट दाखवले.
छगन भुजबळ म्हणाले, "काय नैतिक आणि काय अनैतिक आहे, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कारभारी ठरवतील, मी त्याच्यावर काय बोलू शकतो? विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नांवर कारभारी उत्तर देतील". महापुरूषांच्या अतिक्रमणांसंदर्भात देखील सरकार निर्णय घेतली, असेही भुजबळ यांनी सांगितले.
वरिष्ठ नेते असून, देखील तुम्हाला राज्यात डावलले जात आहे का? सुधीर मुनगंटीवार तुमच्या सारखे अनुभवी नेते मंत्रिंमडळात नाहीत, वारंवार आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे. यावर छगन भुजबळ यांनी मग, मग काय करू? काय करू?, असा प्रतिप्रश्न करत, प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.