Devidas Pingle Politics: देविदास पिंगळे यांनी सभापती चुंभळे यांचा वार पलटलवला... थेट आव्हान देत म्हणाले, तर...

Devidas Pingle;Pingale rejected Chairman Chumbhale's allegations, challenged the directors-नाशिक बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंबळे यांनी माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर आरोप केले होते
Kalpana Chumbhale & Devidas Pingle
Kalpana Chumbhale & Devidas PingleSarkarnama
Published on
Updated on

Devidas Pingle News: भाजपच्या कल्पना चुंभळे नाशिक बाजार समितीच्या नव्या सभापती झाल्या आहेत. त्यांनी माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या गटातील संचालक फोडले होते. त्यामुळे नाशिक बाजार समितीत राजकारण चांगलेच रंगले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कल्पना चुंभळे सभापती झाल्यानंतर त्यांनी पहिली बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माजी सभापती पिंगळे यांच्यावर विविध आरोप केले होते. समितीने प्रस्तावित केलेला खत प्रकल्प देखील रद्द करण्याची घोषणा केली. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

Kalpana Chumbhale & Devidas Pingle
Devendra Fadnavis Politics: सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचीच चलती; मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दूर ठेवले!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी सभापती देविदास पिंगळे यांनी चुंभळे यांचे सर्व आरोप फेटाळले. या आरोपांना त्यांनी थेट आव्हान दिले. आर्थिक आमिष दाखवून संचालक फोडण्यात आले आहेत. त्यामुळे हे खोटे आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Kalpana Chumbhale & Devidas Pingle
Girish Mahajan : साधू महंतांची नामी शक्कल; मंत्री गिरीश महाजनांना इच्छा नसतानाही प्यावं लागलं गोदावरी नदीचं पाणी, नेमकं प्रकरण काय?

या संदर्भात माझी खासदार पिंगळे यांनी सभापती श्रीमती चुंभळे यांना खुले आव्हान दिले आहे. श्रीमती चुंभळे यांनी केलेला एक जरी आरोप सिद्ध केला, तर आपण राजकारण सोडण्यास तयार आहोत, असे थेट उत्तर त्यांनी दिले. सभापती श्रीमती चुंबळे यांच्या आरोपांची त्यांनी अक्षरशा खिल्ली उडवली.

बाजार समितीतील सुरक्षा रक्षकांच्या संख्येबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माजी खासदार चुंबळे म्हणाले, असे आरोप अक्षरशा हास्यस्पद आहेत. सभापती बाजार समितीत किती सुरक्षा रक्षक आहेत, हे मोजायला जात असतो का? असा प्रश्न त्यांनी केला. या विषयावर काही वाद असेल तर संबंधित कंत्राटदार हे चुंभळे यांचे जावईच आहेत. त्यांना विचारणा करून माहिती घ्यावी असा चिमटा ही त्यांनी घेतला.

शिवाजी चुंभळे आणि माजी खासदार देविदास पिंगळे हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत पिंगळे यांच्या पॅनलने बाजी मारली होती. त्यात चुंभळे पॅनलचे पुरेसे संचालक निवडून आले नव्हते. आता चुंभळे यांनी भाजप पक्षात प्रवेश करून सत्ताधारी पिंगळे यांचेच संचालक गडाशी लावले होते. त्यामुळे बाजार समितीत सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com