Devendra Fadnavis Politics: सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचीच चलती; मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दूर ठेवले!

Devendra fadnavis;Ministers Manikrao Kokate, Dada Bhuse kept away from Kumbh Mela-कुंभमेळ्याच्या तयारीच्या बैठकांमध्ये भाजपने महायुतीतील सहकारी पक्षांच्या माणिकराव कोकाटे, दादा भुसे यांना दूर का ठेवले?
Girish Mahajan, Dada Bhuse & Manikrao Kokate
Girish Mahajan, Dada Bhuse & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत आतापर्यंत विविध बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांनी त्याला हजेरी लावली. आता या बैठकांतून पुढील कामकाजाला दिशा देण्याचा प्रयत्न झाला आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकला सिंहस्थाची विशेष बैठक झाली. बैठकीनंतर प्रशासनाकडून कामकाजाला गती देण्यात आली. संबंध प्रक्रियेत महाविकास आघाडीतील मोजक्या नेत्यांची आणि पक्षांचीच हजेरी होती. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

Girish Mahajan, Dada Bhuse & Manikrao Kokate
Girish Mahajan : साधू महंतांची नामी शक्कल; मंत्री गिरीश महाजनांना इच्छा नसतानाही प्यावं लागलं गोदावरी नदीचं पाणी, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर आणि नासिक येथे साधू महंतांची बैठक झाली. या बैठकांमध्ये साधू, महंत आणि आगामी कुंभमेळ्या बाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. प्रशासन आणि मंत्री दोघांचे उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एकंदरच भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसले.

Girish Mahajan, Dada Bhuse & Manikrao Kokate
Manikrao Kokate : आधीच अजितदादांच्या वक्तव्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांनी दिला झटका; म्हणाले, "कर्जमाफीचं आश्वासन..."

नाशिक जिल्ह्यात महायुतीचे तीन स्थानिक मंत्री आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवड आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत. मात्र या मंत्र्यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

जिल्ह्यात राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे दोन खासदार आहेत. ते विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळे त्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजात फारसे विश्वासात घेण्यात आले नाही. त्यांनी याबाबत थेट संसदेत झालेल्या चर्चेत याकडे लक्ष वेधले. राज्य शासन खासदारांना कुंभमेळ्याच्या तयारीबाबत विश्वासात घेत नाही. खासदार वाजे यांच्या मतदारसंघातच सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीला महत्त्व आहे.

मात्र अशीच तक्रार सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची देखील आहे. विशेषतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नावे सांभाव्य पालकमंत्री म्हणून स्पर्धेत आहेत. सध्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही. अशा स्थितीत या दोन्ही मंत्र्यांना शासनातील व्यवस्थेने जाणीवपूर्वक कुंभमेळ्याच्या तयारीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवले आहे. मंत्र्यांना आणि आमदारांना याबाबतची निमंत्रण देण्यात आलेली नाही अशी तक्रार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकीय मायलेज देणारा विषय आहे. त्याच्या शासनाचा दृष्टिकोन आणि कामकाजातील संथपणा विचारात घेता विकास कामे यापेक्षा प्रचारकी कुंभमेळा करण्यावर सरकारचा भर असू शकतो. तसेच संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे तर कृषी मंत्री कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लांब ठेवण्याचे राजकारण तर होत नाही ना याची चर्चा सुरू आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com