Rajshree Ahirrao: तहसीलदारांना आमदार व्हायचंय; देवळालीमधून BJPकडून रिंगणात?

Devlali Assembly Constituency: सरोज आहिरे यांच्याशी उघड वाद सुरू झाल्यापासूनच त्यांनी आमदारकी लढवयाची असा निश्चय केला.
Devlali Assembly Constituency news
Devlali Assembly Constituency newsSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik: थेट आमदारकीच लढवयाची, या इराद्याने तहसीलदारपदाचा राजीनामा देणाऱ्या राजश्री आहिरराव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे देवळाली मतदार संघामध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. देवळाली मतदार संघावर भाजपा हक्क सांगणार काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

नाशिकमध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री आहिरराव आपल्या कामात सातत्याने हस्तक्षेप करतात, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी केला. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. आमदार आणि तहसीलदारांमधील वाद बराच रंगला. मात्र, शासकीय सेवेत असल्याने आहिरराव यांनाही बोलण्यास आणि कामे करण्यास मर्याद होत्या. त्यामुळे त्यांनी सेवेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा राजीनामा प्रशासनाने मंजूर केला. सरोज आहिरे यांच्याशी उघड वाद सुरू झाल्यापासूनच त्यांनी आमदारकी लढवयाची असा निश्चय केला.

भारतीय जनता पक्षासोबत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या. अखेर आहिरराव यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावण्णकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सहा मतदार संघ मिळून तयार होणाऱ्या धुळे लोकसभा मतदार संघासाठी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील एक पोलिस आणि एक तहसीलदार असे दोन सेवा निवृत्त सनदी अधिकारी भाजपात डेरेदाखल झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवळाली विधानसभेची वाढली चुरस

देवळाली विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी थेट लढत असते. मात्र पक्षीय फुटाफुटीच्या राजकारणामुळे देवळाली विधानसभा मतदार संघाची चुरस यामुळे खूपच वाढली आहे. सध्याच्या आमदार सरोज आहिरे अजित पवार गटाकडे असून, घोलप कुटुंबाचा प्रवास राजकीयदृष्ट्या कसा होणार याकडे देवळालीवासीयांचे लक्ष आहे. शिंदे गटाचे लक्ष घोलप कुटुंबाकडे असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर शिवसेनेच्या उबाठा गटाचा बालेकिल्ला असलेला देवळाली मतदार संघ ताब्यात ठेवण्यासाठी मोठा प्रयत्न होईल. वास्तविक, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या राजश्री आहिरराव यांच्यामुळे भाजपा या मतदार संघावर हक्क प्रस्थापित करेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

Devlali Assembly Constituency news
Vanchit Bahujan Alliance: 'वंचित'ला महाविकासचे 'चॉकलेट'; इंडिया आघाडीच्या 'लॉलीपॉप'चे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com