Devyani Pharande politics: ‘ड्रग्ज’च्या प्रश्नावर आमदार देवयानी फरांदे झाल्या आक्रमक!

Devyani Pharande; BJP MLA Pharande aggressive on drugs and law and order issues-भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
MLA Devyani Pharande with CP Sandeep Karnik
MLA Devyani Pharande with CP Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Devyani Pharande News: नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी ‘ड्रग्ज’ घेतलेल्या युवकांनी गोंधळ घालत पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गेले काही दिवस नाशिक शहर ‘ड्रग्ज’च्या विळख्यामुळे चर्चेत आहे. या संदर्भात पोलिसांनी कारवाई करून ‘ड्रग्ज’चा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री काही युवकांनी पोलिसांशीच हुज्जत घातली होती.

MLA Devyani Pharande with CP Sandeep Karnik
Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी? काय आहे प्लॅन?

या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे या आता मैदानात उतरल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ मंडळासह नुकतेच पोलीस आयुक्त कर्णिक यांची त्यांनी भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत अनाधिकृतपणे सुरू असणारे हॉटेल्स, बार आणि मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

MLA Devyani Pharande with CP Sandeep Karnik
Mahayuti Politics: जळगावचे शेतकरी लाडक्या बहिणींवर संतापले?, हे आहे कारण!

याबाबत पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी आणि शहराला या सर्व गैरप्रकारांपासून सुरक्षित ठेवावे. गुन्हेगार आणि शहरात होणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीबाबत देखील पोलिसांनी सक्तीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.

नाशिक शहरात शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालयांच्या सभोवताली या अनधिकृत ‘ड्रग्ज’ विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि युवक त्याच्या आहारी जात आहेत. त्यातून शहरात गंभीर सामाजिक आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी त्याला आळा घालावा.

सार्वजनिक उद्याने, बागा, शाळा, महाविद्यालये, बिअर बार, हॉटेल्स, क्लब या सर्व ठिकाणी हे प्रकार सर्रास सुरू आहे. शहरातील द्वारका, इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, वडाळा गाव आणि परिसरात परिस्थिती अतिशय गंभीर होऊ पाहत आहे. असे यावेळी आमदार फरांदे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, काशिनाथ शिलेदार अॅड. शाम बडोदे, वसंत उशीर, भास्कर घोडेकर, अजिंक्य फरांदे, सागर शेलार यांसह विविध पदाधिकारी शिष्टमंडळात होते. एकंदरच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाहनांची होणारी नासधूस याकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यात भाजप पुढे आला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com