Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी? काय आहे प्लॅन?

Eknath Shinde; Dada bhuse confident, will do something big in Dy CM Nashik Visit-शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणतात, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात काहीतरी मोठे होईल!
Uddhav Thackerey & Eknath shinde
Uddhav Thackerey & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जोमाने कामाला लागला आहे. सातत्याने विविध सहकारी पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काय होते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या तयारीबाबत बैठक घेतली. सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्क नेते अजय बोरस्ते, शहराध्यक्ष बंटी तिदमे यावेळी उपस्थित होते. त्यांनी सभा होणाऱ्या गोल्फ क्लब मैदानाची पाहणी देखील केली.

Uddhav Thackerey & Eknath shinde
Mahayuti Politics: जळगावचे शेतकरी लाडक्या बहिणींवर संतापले?, हे आहे कारण!

हे पदाधिकारी आज दिवसभर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह विविध नेत्यांना संपर्क करीत असल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे म्हणाले, विविध नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. प्रत्येकाला आगामी राजकारणात काय होईल, याचा अंदाज असतो. त्या दृष्टीने ते आपल्याला फायदेशीर ठरेल असे निर्णय घेतात

Uddhav Thackerey & Eknath shinde
Bangladeshi citizen Malegaon: बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न हा पराभूत उमेदवारांचा मालेगाववरील राजकीय सूड!

उद्या (ता. १४) उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा आहे. या सभेत अनेक प्रवेश होऊ शकतात. कोण शिवसेना शिंदे पक्षात येईल, हे सांगायचे नसते. त्यामुळे उद्याच्या सभेत अनेकांना आश्चर्य वाटेल, असे काहीतरी घडेल. असे संकेत त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाला मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे आमच्या पक्ष सत्तेत आहे. त्याचा सातत्याने विस्तार होत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे हे आभार दौरा करीत आहे. या दौऱ्यात अनेक शुभशकुन घडत आहेत. अनेक नेते या पक्षात येण्यासाठी तयार आहेत. राज्यातील जनतेने रोज होणाऱ्या या प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा अनुभव घेतला आहे.

यावेळी भुसे यांनी उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केलेले आमदार राजन साळवी यांचेही स्वागत केले. आमदार साळवी हे आमचेच होते. ते आता स्वगृही परत आले आहेत. ज्यांना जो जो अनुभव असतो त्या पद्धतीने लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याच्या त्याच्या विचाराने मार्गक्रमण केले जाते. श्री. साळवी आता शिंदे पक्षात आले आहेत. असे अनेक नेते शिंदे पक्षात आलेले दिसतील, असा दावा त्यांनी केला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com