Devyani Pharande Politics: आमदार देवयानी फरांदे यांची धाड अन् पोलिसांची नाचक्की! पोलिसांना दिसले नाही ते फरांदेंनी शोधले

Devyani Pharande; MLA Farande's raid on controversial cafe, question mark on police-धडाकेबाज आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
MLA Devyani Pharande
MLA Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Devyani Pharande News: भाजपच्या आमदार देवयानी फरांदे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची धडाकेबाज कार्यशैली हे त्याचे कारण आहे. आता त्यांनी चक्क एका कॅफेवर धाड टाकत गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे.

नाशिक शहरात सध्या विविध गैरप्रकार वाढत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी हे शहर चर्चेत आले आहे. सामान्यांना त्रस्त करणारे या प्रश्नावर शहराच्या आमदार देवयानी फरांदे थेट ॲक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी रविवारी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका वादग्रस्त कॅफेवर धाड टाकली.

MLA Devyani Pharande
Manikrao Kokate Breaking: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेप्रकरणी मोठी अपडेट, निकाल लांबला, आता 'या' तारखेला सुनावणी

आमदार देवयानी फरांदे या ठिकाणी पोहोचल्या त्यावेळी अतिशय गंभीर प्रकार आढळला. या कॅफेमध्ये आडोसा उपलब्ध करून देऊन तरुण-तरुणींना अश्लील वर्तन करण्याची सोय आढळली. काही युवक, युवती नको त्या स्थितीत दिसले. मध्यवस्तीतील या कॅफेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

MLA Devyani Pharande
Raksha Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड; जत्रेत काढला व्हिडिओ

आमदार देवयानी फरांदे यांनी यापूर्वी इंदिरानगर भागातील एका बेकायदेशीर व्यवसाय असलेल्या हॉटेलवर छापा टाकला होता. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले होते. त्यांनी शहरातील विनापरवाना दारू विक्री आणि तत्सम हॉटेल्सला बंदी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा आमदार फरांदे यांनी धाड टाकल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील संस्कृती बिघडत चालली आहे. शहराची ही प्रतिमा परवडणारी नाही. त्यामुळे नाशिक शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रण आणावेच लागेल. महाविद्यालयांनी देखील कार्यपद्धती बदलावी. लोकप्रतिनिधींना माहिती मिळते, ते कारवाई करतात. मग पोलिसांना ही माहिती का मिळत नाही? असा गंभीर प्रश्न आमदार फरांदे यांनी या धाड मोहिमेनंतर विचारला.

शहरातील संस्कृती बिघडत चालली आहे. शहराची ही प्रतिमा परवडणारी नाही. त्यामुळे नाशिक शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रण आणावेच लागेल. महाविद्यालयांनी देखील कार्यपद्धती बदलावी. लोकप्रतिनिधींना माहिती मिळते, ते कारवाई करतात. मग पोलिसांना ही माहिती का मिळत नाही? असा गंभीर प्रश्न आमदार फरांदे यांनी या धाड मोहिमेनंतर विचारला.

शहराच्या अनेक भागात असे गैरप्रकार सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून फसविले जाण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन असे गैरप्रकार थांबविले पाहिजे. नियमित कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील एक महिन्यापूर्वी थेट मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकली होती. त्यानंतर देवयानी फरांदे या महिला आमदाराने दोन ठिकाणी धाड टाकली आहे. लोकप्रतिनिधींची कार्यशैली या निमित्ताने अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. पोलिसांसह सरकारी प्रशासनाला यातून सावध होण्याचा संदेश मिळत आहे. नागरिकांl देखील हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com