Devendra Fadnavis Politics: धनंजय मुंडेंचा राजीनामा; देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोक, अजित पवारांची केली कोंडी!

Dhananjay Munde; Chief Minister Devendra Fadnavis' political message is troubling Ajit Pawar?-मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपरिहार्य होता. मात्र त्याचे श्रेय अजित पवार यांनी गमावल्याचा राज्यभर संदेश
Dhananjay Munde, Devendra Fadanvis & Ajit Pawar
Dhananjay Munde, Devendra Fadanvis & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आज तसे आदेश दिले. त्यानंतर गेले दोन महिने विणलेल्या भाजपच्या जाळ्यात धनंजय मुंडे अलगद अडकले.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आले. या सरकारकडे प्रचंड बहुमत असल्याने विरोधक असहाय असल्याचे चित्र होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींची भूमिका महायुतीच्याच नेत्यांकडून पार पडली जात असल्याचे चित्र गेल्या दोन महिन्यात दिसले.

Dhananjay Munde, Devendra Fadanvis & Ajit Pawar
Devidas Pingle Politics: अविश्वास प्रस्ताव: सुरत, गुवाहाटी नव्हे; बाजार समितीचे संचालक थेट दुबईत?

मस्साजोग (बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूर पद्धतीने खून झाला. यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून ते झाले. खंडणी आणि गुन्हेगारी यामागे होती. या गुन्हेगारांना मंत्री धनंजय मुंडे यांचे पाठबळ होते, असा आरोप आहे. याबाबत असंख्य पुरावे मध्यमातून पुढे आले. तेच शवपेटीचा शेवटचा खीळा ठरले.

Dhananjay Munde, Devendra Fadanvis & Ajit Pawar
Vanchit Bahujan Aaghadi : भाजपच्या आमदाराचा निरोप धुडकवला; वंचितचा 'झुकेगा नहीं'चा इशारा

संतोष देशमुख हत्येच्या तीव्र प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटल्या होत्या. विशेषत: मराठा समाजाच्या विविध संघटना एकत्र आल्या होत्या. त्यांनी याबाबत राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची मोहीम राबवली. त्यात भाजपचे आमदार सुरेश धस आघाडीवर होते.

या प्रकरणातून खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला स्पष्ट संदेश होता. हे राजकीय डावपेच सुरेश धस, अंजली दमानिया यांच्यामुळे पडद्यामागून भाजप करीत आहेत, हे लपून राहिले नव्हते. या सर्व प्रकारातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातत्याने मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विचारणा होत होती.

याबाबत सर्वत्र जोरदार राजकीय टीका केली जात होती. विधिमंडळातही हा प्रश्न उपस्थित झाला. यातून मंत्री मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संरक्षण आहे, असा संदेश सातत्याने गेला. या मागे विविध राजकीय गट कार्यरत होते. त्याचा फटका अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना सोसावा लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना वगळल्याने पक्षांतर्गत आणि ओबीसी प्रपोगंडा यातून अडचणीत होते. त्यात धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्यास विशिष्ट समाजाची नकारात्मक प्रतिक्रिया त्यांना अडचणीची ठरू शकते, असे पवार यांच्या निकटवर्तीयांचे मत झाले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच पहिल्याच दिवशी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न विरोधकांनी लावून धरला. यामध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी अडचण होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या सूचना करून त्यांनी आपली सोडवणूक करून घेतली.

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com