Maharashtra Politics : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा ठरली पोकळ!

Dhananjay Munde Politics, Agriculture Minister`s announcement did not come in true-कृषिमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी पीकविम्याची रक्कम मिळेल अशी घोषणा केली होती, ती घोषणा फाेल ठरली आहे.
Kunal Patil & Dhananjay Munde
Kunal Patil & Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde Politics : राज्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीत अग्रिम भरपाई देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात न आल्याने काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (Crop insurance advanced relief in Drought affected areas to Farmers not came in fact)

महाराष्ट्रात (Maharashtra) दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाअभावी पिके वाया गेली. विमा कंपन्यांनी भरपाई देणे अपेक्षित होते, याबाबत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घोषणा केली होती. तसे काहीच झाले नाही. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) नेते आमदार कुणाल पाटील यांनी टीका केली आहे.

Kunal Patil & Dhananjay Munde
Maratha Reservation: "मला माझ्याच वक्तव्याचा आता पश्चाताप होतोय!"; संभाजीराजे भुजबळांबाबत असं का म्हणाले ?

दिवाळीपूर्वीच पीकविम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. मात्र, आता या घोषणेवरूनच विरोधकांनी कृषिमंत्र्यांना घेरण्याची तयारी केली आहे. दिवाळी झाली तरीही अद्याप शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळालेली नाही.

आता या विषयावर शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या काही दिवसांत पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर या विषयावर राज्य सरकारशी दोन हात करण्याची तयारी काँग्रेसचे नेते, आमदार कुणाल पाटील यांनी आक्रमक होत यासंदर्भात कृषिमंत्री व राज्य सरकारला इशारा दिला आहे.

धुळे जिल्ह्यातील २,४६,८४७ शेतकऱ्यांनी खरीप हंगामात २,५३,८२३ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला आहे. त्यात धुळे तालुक्यातील ६७,५८१ हेक्टर क्षेत्रातील ८०,५८६ शेतकऱी आहेत. मात्र, आता त्यात विविध त्रुटी काढल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.

शासनाने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. आवळा देऊन कोहळा घेणाऱ्या विमा कंपन्या मालामाल होत आहेत, तर त्यांच्या भरवशावर शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शासनाने दुष्काळ आणि दुष्काळसदृश या शब्दखेळात न खेळता तातडीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

Kunal Patil & Dhananjay Munde
Sanjay Raut : ''शिवतीर्थावर स्मृतिस्थळी अफझलखानाच्या...'' ; शिंदे-ठाकरे गटातील राड्यानंतर संजय राऊतांचं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com