Sanjay Raut : ''शिवतीर्थावर स्मृतिस्थळी अफझलखानाच्या...'' ; शिंदे-ठाकरे गटातील राड्यानंतर संजय राऊतांचं विधान!

Thackeray Vs Shinde : शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच! असा इशाराही दिला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या(शुक्रवार) स्मृतिदिन आहे. मात्र, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येसच दोन्ही शिवसेना गटांमध्ये म्हणजेच ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोरच राडा झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Nagar Janata Darbar : नगर दक्षिणमध्ये प्रत्येक महिन्याला जनता दरबार; विखेंनी अधिकाऱ्यांना दिला होमवर्कचा सल्ला!

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन पाहणी केली. मात्र, यानंतर मग त्याच ठिकाणी दोन्ही गट आमनेसामने आले. एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या घटनेवर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या राड्यावर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणतात, '' शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृतिस्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायला हवे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतिस्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही. त्याप्रमाणे शिवतीर्थावर स्मृतिस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्याचा भंग होईल. शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच! जय महाराष्ट्र!''

Sanjay Raut
Sushma Andhare : '' शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ बाटवले'' ; सुषमा अंधारेंचा घणाघात!

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, '' बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन शुक्रवारी आहे. त्या दिवशी कोणताही संघर्ष, वाद नको म्हणून त्यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात आदल्या दिवशीच दर्शन घेतो. मी स्वत: आणि आमचे कार्यकर्ते शुक्रवारी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. आम्ही नतमस्तक झालो. त्यानंतर आम्ही निघालो.

मात्र, आमचे कार्यकर्ते स्मृतिस्थळावरून निघत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी वातावरण, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं. खरं तर तसं करण्याची आवश्यकता नको होती. पायाखालची वाळू सरकली म्हणजे सगळं गेलं, अशी भावना त्यांच्या मनात आहे. त्याचमुळे असा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com