ACB News: 5 लाखांची लाच स्वीकारणारा 'वाघ' ACBच्या पिंजऱ्यात! धुळ्यात लिपिकाकडून सुरू होता 14 महिने पैशांसाठी छळ

Dhule ACB raid: धुळ्यात 5 लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद लिपिक पुरुषोत्तम वाघ आणि मध्यस्थाला ACBने रंगेहाथ पकडले.
Dhule ACB raid
Dhule ACB raidSarkarnama
Published on
Updated on

Dhule crime News: महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात नियुक्तीच्या शिफारशीसाठी चक्क साडेपाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. लाच मिळत नसल्याने सुरक्षा रक्षकांना 14 महिन्यांपासून त्रास दिला जात होता.

धुळे येथील सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात नियुक्तीची शिफारस हवी होती. त्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिपिकाने 14 महिने त्यांना तीष्ठत ठेवले. हे कर्मचारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून दमले होते.

किमान सहा महिन्यांचा कामाचा अनुभव असलेल्या सुरक्षारक्षक वा अन्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात समाविष्ट केले जाते. त्यानुसार धुळे येथील पाच सुरक्षारक्षकांनी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. मात्र त्यांना काहीही प्रतिसाद मिळत नव्हता.

संबंधित कक्षातील लिपिक पुरुषोत्तम वाघ (वय ५०) याने या पाच सुरक्षारक्षकांकडून प्रत्येकी दीड लाख अशा साडेसात लाख रुपयांची मागणी सुरुवातीला केली. नंतर पैसे मिळत नसल्याने दीड वर्ष कर्मचाऱ्यांना तीष्ठत ठेवले. ते मिळाल्याशिवाय काम होणार नाही असे सांगितले.

Dhule ACB raid
Kunbi Caste Certificate: कुणबी जातवैधता पडताळणीची वस्तुस्थिती; आकडेवारी नेमकं काय सांगते? मराठा-कुणबी नोंद मुद्दा काय?

कंटाळलेल्या या कर्मचाऱ्यांनी ५ लाख ८० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यातील एक लाख रुपयांची लाच लिपिक वाघ यांनी स्वीकारले. उर्वरित ४.८० लाख रुपये देण्यापूर्वी संबंधितांनी जळगावच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारीची शहनिशा आणि छाननी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. वाघ याने धुळे शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे मध्यस्थ बारकू पाटील यांच्यामार्फत पैसे स्वीकारणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार मंगळवारी एसीबीने सापळा लावला होता. यावेळी ४.८० लाख रुपये लाच घेताना मध्यस्थ पाटील आणि लिपिक वाघ याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com