Dhule Cash Controversy: 'धुळे कॅश' प्रकरणात अर्जुन खोतकरांनी घेतला अनिल गोटेंचा धसका! विश्रामगृहाकडे फिरकलेच नाही!

Arjun Khotkar Vs Anil Gote : आमदार खोतकर यांनी विश्रामगृहात सापडलेल्या पैशांबाबत वारंवार उल्लेख करीत त्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला.
Anil Gote & Arjun Khotkar
Anil Gote & Arjun KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Arjun Khotkar News : विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी आमदारांची स्पर्धा असते. मात्र, माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे विश्रामगृहातील कॅश प्रकरणात उजेडात आणून अनेकांची अडचण केली आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची पुरती कोंडी झाली आहे. त्यांच्या पीएच्या नावावर बूक असलेल्या विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 84 लाख रुपये कॅश मिळाले.

माजी आमदार अनिल गोटे यांचा विधीमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांनी मोठा धसका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या बैठकीला निम्म्याहून अधिक आमदार गैरहजर होते. ते या दौऱ्याकडे फिरकलेच नाहीत. शिवाय अर्जुन खोतकरांनीही हाॅटेलमध्ये होणारी बैठक जिल्हाधिकार्यालयात घेतली.

धुळे कॅश प्रकरणात अनिल गोंटेंच्या निशाण्यावर अर्जुन खोतकर आहेत. त्याचा पीए यामध्ये सापडल्याने त्यांची अडचण वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट एसआयटीची स्थापन केली आहे. अर्जुन खोतकर व त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी अनेकांचे धावपळ होत असल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहे.

Anil Gote & Arjun Khotkar
NCP News : एकत्रीकरणाला अजित पवारांचा पक्ष राजी होईल?

अर्जुन खोतकर यांनी आरोप फेटाळले

आमदार खोतकर यांनी विश्रामगृहात सापडलेल्या पैशांबाबत वारंवार उल्लेख करीत त्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला. जे विश्रामगृह विधिमंडळ अंदाज समितीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्याकडे आपण फिरकले देखील नाही. आपण दौऱ्यावर होतो, असे देखील खोतकर यांनी सांगितले.

खोतकरांचा स्वर बदलला...

नियोजित दौऱ्यानुसार शुक्रवारी धुळे येथील एका हॉटेलमध्ये विधिमंडळ अंदाज समितीचे बैठक होणार होती. मात्र ऐनवेळी ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत देखील खोतकर यांचा स्वर अतिशय मृदू होता. त्यांनी सर्वच यंत्रणांचे तोंड भरून कौतुक केले. बैठक झाल्यावर ते थेट मुंबईला रवाना झाले.

तुकाराम मुंडेंमार्फत चौकशी करा

विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 85 लाख रुपये मिळाले. मात्र, अनिल गोटे यांनी खोलीत पाच कोटी होते. बाकीचे पैसे लंपाल केल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या एसआयटी चौकशीवर आपला विश्वास नसल्याचे सांगत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अथवा नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचा मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Anil Gote & Arjun Khotkar
India Vs Pakistan : मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त दणका; आता २३ जून पर्यंत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com